निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील दारूची आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:34+5:302021-01-08T05:55:34+5:30
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमा लागून आहेत. सीमासुद्धा उघड्या आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील स्वस्त दारू तुमसर तालुक्यात येण्याची ...
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमा लागून आहेत. सीमासुद्धा उघड्या आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील स्वस्त दारू तुमसर तालुक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. पुढील १५ दिवस येथे निवडणुकीची रणधुमाळी आहे. गावातील तळीराम मतदारांना आकर्षित करण्याकरिता दारूचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे. गावखेड्यात राजकारण तापले आहे. तळीराम मतदारांना दारूचे आमिष दाखविण्यात येते. त्यामुळे शहरातून दारू खरेदी करणे सध्या जोखिमीची आहे. त्याकरिता मध्य प्रदेशातून स्वस्त दारूची खेप येथे दाखल होत असल्याचे समजते. तळीरामांना आकर्षित करण्याकरिता दारूच्या मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. परंतु त्यामुळे जीवाला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीमार्गाने स्वस्त दारू आणली जाते. मध्य प्रदेशातील एजंट तुमसर तालुक्यातील एजंटसोबत संपर्कात असतात. त्यानंतर ते मागणी करणाऱ्यांना दिलेल्या ठिकाणी दारू पोहोचती करतात. येथे अवैध दारू विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे.