सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व टिकून राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:43 PM2018-04-18T22:43:34+5:302018-04-18T22:43:34+5:30
तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
स्थानिक श्री संत तुकाराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थाद्वारे बुधवारी कुणबी समाजाद्वारे समर्थ नगरच्या मैदानात रोप्य महोत्सवी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध झालीत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीयमंत्री खा.प्रफुल पटेल, माजी खा. नाना पटोले, आ. राजेश काशिवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. मधुकर कुकडे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दुग्ध सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा टिचकुले, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, नेत्रतज्ञ डॉ. दुर्गेश चोले, माजी जि.प. सभापती विनायक बुरडे, माजी जि.प. सभापती नरेश डाहारे, बाजार समिती सभापती शिवराम गिºहेपुंजे, जि.प. सदस्य आकाश कोरे, बीडीसी बँकेचे संचालक विलास वाघाये, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सरपंच सुनिता भालेराव आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मुला-मुलींना शिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे होऊ देणे महत्त्वाचे असल्याचेही खा. पटेल यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर यांनी केले. माजी खासदार नाना पटोले यांनी सामूहिक विवाह सोहळ्याची उपयुक्तता स्पष्ट केली. शेतकरी व शेतमजुराच्या हितासाठी आपण संघर्ष करीतअसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आ. परिणय फुके यांच्याकडून बधु-वरांना आलमारी भेट देण्यात आली. आ. काशिवार यांच्याकडून वधू-वरांना शिलाई मशनि भेट देण्यात आली.
आ. काशिवार यांनी पूर्व विदर्भातील शेतकीर धान उत्पादन करणारा आहे तो श्रीमंत नाही त्यामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा महत्वाचा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत वाघाये यांनी केले. आभार उमराव आठोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक राजेश बांते, विलास वाघाये, रामदास सार्वे, गंगाधर लुटे, माधवराव भोयर, परसराम फेंडरकर, भोजराम डहाके, रमेश झलके, मधुकर मोहतुरे, मंगेश कानतोडे, रमेश रोटके, अलका खराबे, अर्चना ढेंगे यांनी सहकार्य केले. सोहळ्यात १५ हजारपेक्षा जास्त वºहाडी मंडळी उपस्थित होती.