मनुष्य जीवनात सद्गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 09:32 PM2019-02-20T21:32:46+5:302019-02-20T21:33:15+5:30

नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती मिळवणे आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरुची गरज आहे, असे प्रवचन श्री संत विदेही वसंतबाबा यांनी नरदेह विवेचन या विषयावर बोलताना केले.

The importance of a Sadguru in human life is unique | मनुष्य जीवनात सद्गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण

मनुष्य जीवनात सद्गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण

googlenewsNext
ठळक मुद्देसंत विदेही वसंतबाबा : सावरबंध येथे संत संमेलन व गोपालकाला उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभली : नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती मिळवणे आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरुची गरज आहे, असे प्रवचन श्री संत विदेही वसंतबाबा यांनी नरदेह विवेचन या विषयावर बोलताना केले.
साकोली तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरबंध येथे श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा आश्रमातर्फे चार दिवसीय संत संमेलन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या संत संमेलनादरम्यान रविवारला संताचे आगमन व सायंकाळी हवनविधी पार पडला. त्यानंतर सोमवारला सूर्योदयी घटस्थापना, ध्वजारोहण, आरती, पुजन, श्री संत विदेही वसंतबाबा यांचे हस्ते करण्यात आले.
यानंतर दुपारी संत विदेही वसंतबाबा, सहयोगी विठ्ठलबाबा मेंढे, श्री संत बंडूबाबा खडके यांच्या अमृतवाणीद्वारे हरिपाठ, प्रवचन, आरती प्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारला पहाटे काकड आरती, हरिपाठ नंतर संपूर्ण गावातून भक्तदिंडी काढण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या भक्तांनी संपूर्ण गावातून घोडे, ढोल, ताशे वीण, मृदंग, टाळ यांचा गजरात दिंडी काढली. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
यानंतर श्री संत सद्गुरु विदेही वसंतबाबा यांचे नरदेह विवेचन या विषयावर आध्यात्मिक प्रवचन झाले. यावेळी लाखोचा संख्येने असलेले भाविक भक्त भक्तीमय, मंत्रमुग्ध झााले होते. यावेळी गोपालकाल्याचे कीर्तन व संत विदेही मोतीराम बाबा यांची आरती झाली.
यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम रात्रीपर्यंत सुरु होता. यात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बुधवारला पहाटेपासून चुलबंद नदीवर जाऊन गंगास्थानाचा लाभ भक्तांनी घेतला. भाविकांच्या दिंडीसोबत जवळपास २ ते ३ किलोमिटर भाविकांच्या रांगा पहावयास मिळाल्या. दुपारी श्री संत यादवराव बाबा खेडीकर, भीमा मातोश्री बेंदवार, शांताबाई इटवले, श्री संत विदेही मोतीराम बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यासंत संमेलनाला अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून भाविक मोठ्या श्रध्देने उपस्थित होते. महाप्रसाद सुरळीत चालावा यासाठी सेवाधारी मंडळीची कामगिरी मोलाची ठरली. वरिल चार दिवसीय संत संमेलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली.

Web Title: The importance of a Sadguru in human life is unique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.