'ट्राय'च्या निर्णयात सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:17 PM2018-12-19T22:17:04+5:302018-12-19T22:17:20+5:30

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

Improve TRAI's decision | 'ट्राय'च्या निर्णयात सुधारणा करा

'ट्राय'च्या निर्णयात सुधारणा करा

Next
ठळक मुद्देनिवेदन : जिल्हा केबल ओनर वेल्फेअर असोसिएशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा किंवा त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा केबल ओनर वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
केबल चालकांचा व्यवसाय शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसतानाही सुरळीत सुरू असताना ट्रायचा निर्णय घेण्यात आला.
आजपर्यंत प्रती महिना २०० रूपये २५० रूपये मासिक वर्गणी जवळपास ४०० चॅनल ग्राहकांना केबल चालकांकडून देण्यात येत आहे. यात काही चॅनल मोफत तर काही चॅनल रोखीचा समावेश आहे. मात्र ट्रायने लागू केलेल्या नवीन निर्णयामुळे ग्राहकांना महिनाकाठी जवळपास हजार रूपये मोजावे लागतील. त्यामुळे केबल चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
सध्या स्थितीत ग्राहकांनाकडून २०० ते २५० रूपये तर ग्रामीण भागात १५० रूपयापेक्षा अधिकची रक्कम देण्यास तयार होत नाही. २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयात शहरी व ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्व ग्राहकांना सरसकट दर लागू करण्यात आलेले आहे. केबची मासीक वर्गणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने अनेक केबलधारक जोडणी बंद करण्याच्या तयारीत आहे. यामुळे केबल चालकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चॅनलचे दर कमीत कमी ५० पैसे व अधिकाधिक पाच रूपये ठेवण्याची गरज आहे. नवीन दराचा निर्णय रद्द करून त्यात सुधारणा करण्यात यावी जेणे करून जुन्या नियमानुसार म्हणजेच डिजिटल अ‍ॅन्ड्रेसेबल केबल टिव्ही सिस्टम (डीएएस) प्रमाणे केबल ग्राहकांची विभागणी चार भागात केली आहे. यात मोठी शहरे, मध्यम शहरे, लहान शहरे, ग्रामीण भाग अशा प्रकारची विभागणी ट्रायच्या नवीन दरवाढीच्या निर्णयात करण्याची गरज असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत प्रधानमंत्री, सूचना व प्रसारन मंत्रालय, खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांना पाठविण्यात आले आहे.
शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, शैलेश जांभुळकर, सुनिल वलके, संजय भुरे, राजेश डोकरीमारे, अनिल चौधरी, दामु पडोळे, संजय चौधरी, सुभाष वंजारी, शरद भांडारकर, अमर उजवणे, जाबीर मालाधरी आदींचा समावेश होता.

Web Title: Improve TRAI's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.