आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, करा सीव्हिजिल अॅपवर तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:33 PM2024-10-18T13:33:12+5:302024-10-18T13:34:01+5:30

Bhanadara : सर्वसामान्य मतदार नागरिकांना करता येणार आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

In case of violation of code of conduct, report on Cvigil app | आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, करा सीव्हिजिल अॅपवर तक्रार

In case of violation of code of conduct, report on Cvigil app

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन अॅप विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.


आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे.


आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल अॅप विकसित केले आहे. या मोबाइल अॅपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल अॅपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त अॅप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडीओ प्रदान करणे आवश्यक आहे.


अचूक कृती व देखरेख 
या अॅप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल अॅप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

Web Title: In case of violation of code of conduct, report on Cvigil app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.