लाखांदूर येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:58 PM2018-01-08T21:58:14+5:302018-01-08T21:58:39+5:30

महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन लाखांदूर येथे करण्यात आले आहे.

Inauguration of Agricultural exhibition at Lakhandur | लाखांदूर येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लाखांदूर येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देयुवक शेतकरी संघटनेचे आयोजन : शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन लाखांदूर येथे करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांपासून ही संघटना कृषीवर आधारीत प्रदर्शनी आणि विहीरींची घसरलेली पाण्याची पातळी यावर काम करीत आहे.
या प्रदर्शनीच्या उदघाटन कार्यक्रमाला माजी खासदार नाना पटोले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, प्रा.युवराज मेश्राम, नागपूर काँग्रेसचे प्रकाश वसू, डॉ.अजय तुमसरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे, प्रदीप बुराडे, भरत खंडाईत, माजी सभापती ईश्वर घोरमोडे, नगरसेवक रामचंद्र राऊत, उपसभापती वासुदेव तोंडरे, भागवत पाटील नाकाडे, संघटनेचे संस्थापक प्रियांक बोरकर, अध्यक्ष जितू सुखदेवे, संदीप नाकतोडे, दिनेश प्रधान, स्वपनील ठेंगडी, श्रीकांत बोरकर, श्रीहरी भेंडारकर, अमित मिसार उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी प्राधान्य देऊ, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असून हा लढा नेहमी सुरू ठेवणार आहे.
यावेळी सुनील फुंडे म्हणाले, पीकविमा हा शेतकऱ्यांसाठी नव्हे तर विमा कंपनीच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांकडून काढून घेतला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. बँक प्रशासनात सर्व निर्णय शेतकरी हिताचे घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या कृषी प्रदर्शनीत कृषी साहित्य, बियाणे, औषधी, मधपालन, कुक्कुटपालन आदींबाबत मार्गदर्शन करणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. ही संघटना यावर्षी विहीरींची खालावलेली पाण्याची पातळी यावर अभ्यास करून तालुक्यात काम करीत असल्याचे प्रास्ताविकात प्रियांक बोरकर यांनी सांगितले. संचालन जितेंद्र ढोरे यांनी तर आभारप्रदर्शन दिनेश वासनिक यांनी केले.

Web Title: Inauguration of Agricultural exhibition at Lakhandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.