पटेल महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:04 AM2017-08-31T00:04:41+5:302017-08-31T00:05:32+5:30
जे.एम.पटेल महाविदयालय भंडारा येथील वाणिज्य विभागाद्वारे वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जे.एम.पटेल महाविदयालय भंडारा येथील वाणिज्य विभागाद्वारे वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे तसेच कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक एल. एम. शटकार व बँक आॅफ महाराष्ट्र शाखा भंडारा चे सहाय्यक व्यवस्थापक बी. ए. भोयर तसेच वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राहुल मानकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. वाणिज्य अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक एम. शटकार म्हणाले कि, सध्याचा युग हा स्पधेर्चा युग आहे त्यामुळे प्रत्येकालाच नोकरी मिळू शकत नाही म्हणून नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांनी उद्योग करण्यासाठी सुरवातीला आपल्याला कोणता उद्योग करायचा आहे ते निवडायचा आहे त्यानंतर त्या उद्योगाचे प्रशिक्षण जिल्हा उद्योग केंद्राद्वारे दिले जाते. त्यातूनच प्रोजेक्ट प्रमाणपत्र प्राप्त करता येते. त्यातूनच अर्थ साहाय्य आणि उद्योगाविषयीची संपूर्ण मार्गदर्शन मिळते. शटकार पुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी आधी आपला उद्देश निश्चित करायला हवा व नंतर त्याला पूर्ण करण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. शिस्त आणि नियमिततेने अभ्यास केल्यानेच यश प्राप्त होईल.
बँक आॅफ महाराष्ट्रचे उपप्रबंधक भोयर म्हणाले कि, उद्योग सुरु करण्यासाठी बँकेमार्फत भांडवलाच्या विविध योजना राबविल्या जातात. केंद्र शासनाने उद्योगाला गती देण्यासाठी सध्या विविध योजना राबविल्या जात आहेत. उद्योग सुरु करण्यासाठी प्रामुख्याने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रेरित करताना भोयर म्हणाले, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये जाण्यासाठी सुगीचे दिवस आलेले आहे. बँकींग या परीक्षेचा विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास केला आणि परीक्षा पास केली तर ते बँकेमध्ये आपली सेवा देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे म्हणाले कि, प्रत्येक वर्षी वाणिज्य विभागाद्वारे वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन केले जाते. त्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम घेतले जातात . सध्या वाणिज्य शाखेला खूप मागणी वाढत आहे. कोणतीच कंपनी वाणिज्य शिवाय शुरू राहू शकत नाही. वाणिज्याच्या आधारावर चीन मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु आहेत.
वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल मानकर म्हणाले कि, विद्यार्थांचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी दरवर्षी वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना केली जाते. त्या मंडळाद्वारे दरवर्षी अनेकविध कार्यक्रम आयोजित केल्या जातात. कोणतेही यश संपादन करण्यासाठी योग्य ध्येय असणे गरजेचे असल्याचे सांगितले. संचालन प्रा. प्रशांत वाल्देव यांनी तर आभार प्रियांका केळझरकर यांनी मानले.
मंडळाचे अध्यक्ष कार्तिक कडव व सहसचिव साक्षी रॉय यांनी वाणिज्य अभ्यास मंडळाबाबत मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा. शैलेश वसानी, प्रा. डॉ. आनंद मुळे, प्रा.धनराज घुबडे, प्रा.प्रशांत गायधने, प्रा.नंदिनी मेंढे, प्रा.सोनू शर्मा, प्रा.माधवी मंदुरकर, प्रा.भाग्यश्री शेंडे, प्रा.योगेश गायधने, प्रा. पदमा देशकर, तसेच मनोहर पोटफोडे, घनश्याम चकोले, विनोद नक्शुलवार आदींनी सहकार्य केले.