क्रीडा संकुलात व्यायामशाळेचे उद्घाटन
By admin | Published: February 11, 2017 12:26 AM2017-02-11T00:26:04+5:302017-02-11T00:26:04+5:30
भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य असलेली ...
भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य असलेली अद्यावत व्यायामशाळाचे उद्घाटन सोहळा पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.बी. पृथ्वीराज, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होते
पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा संकुलामार्फत उभारण्यात आलेली दर्जेदार अद्ययावत व्यायामशाळेचा लाभ घेऊन संबंधित क्रीडा प्रकारात खेळाडूंनी व युवकांनी प्रगती करावी. भंडारा जिल्ह्याचा नाव लौकीक करून गौरव प्राप्त करावा, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या सुजज्ज व्यायामशाळेचा लाभ जिल्ह्यातील खेळाडू, युवकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी उत्कृष्ट व्यायामपटू तयार होण्याकरिता या व्यायामशाळेचा संधीचा लाभ खेळाडू व युवकांनी व सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले. संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे यांनी केले. अद्ययावत व्यायाम साहित्याचे प्रात्यक्षिक मनोज पंधराम यांनी करून दाखविले. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आदींनी प्रशंसा केली. कार्यक्रमाकरिता संदिप खोब्रागडे, भोजराज चौधरी, अनिल इंगळे, मंगेश गुडधे, रविंद्र वाळके, रामभाऊ धुळसे, सूरज लेंडे, पुरुषोत्तम साठवणे, राजू मडावी, तुषार नागदेवे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)