औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:03 PM2018-06-20T22:03:51+5:302018-06-20T22:04:02+5:30

आर.बी. जयस्वाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेला या संस्थेचे उद्घाटन आ.डॉ.परिणय फुके यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत डॉक्टर गुरुप्रसाद पाखमोडे होते. डॉ.परिणय फुके म्हणाले, सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Inauguration of Industrial Training Institute | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देबेला येथे कार्यक्रम : परिसरातील युवकांना मिळू शकणार तंत्रयुक्त शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आर.बी. जयस्वाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेला या संस्थेचे उद्घाटन आ.डॉ.परिणय फुके यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत डॉक्टर गुरुप्रसाद पाखमोडे होते. डॉ.परिणय फुके म्हणाले, सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच सरकारने ‘एक गाव एक इलेक्ट्रीशियन’ ही संकल्पना राबविलेली आहैे. महाराष्ट्र राज्यात जवळपास २८००० ग्रामपंचायती असल्यामुळे २८००० इलेक्ट्रीशियनचे शिक्षण घेतलेल्या तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
मौदा या भागात झालेल्या औद्योगिककरण तसेच भंडारा, तुमसर, पवनी या भागात सरकारने कोट्यवधी रुपयांची योजना आखली असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात टेक्निकल प्रशिक्षण प्राप्त युवकांची गरज भासणार आसहे. संस्थेने चांगले प्रशिक्षण देवून रोजगार सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यास प्रेरित केले. संस्थेचा उद्घाटन कार्यक्रम राबविल्यामुळे संचालक मंडळाचे आभार मानले.
कार्यक्रमाला नगरसेवक रुबी चड्डा, उपसरपंच केला मंगला पुडके, दिनेश पिकलमुंडे, ग्रामीण विद्या विकास शिक्षण संस्थाचे सचिव शकुंतला जयस्वाल, अध्यक्ष दिलीप जयस्वाल, कोषाध्यक्ष कुशल जायस्वाल, मुख्याध्यापक मंगर ढेंगे, राधेश्याम धोटे, पंकज भुते, राकेश सिंगाडे, निशीकांत इलमे, राजेश टिचकुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश धोटे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन अजय मोहनकर यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Inauguration of Industrial Training Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.