सेवाविषयक प्रकरणाने प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 09:36 PM2017-10-15T21:36:44+5:302017-10-15T21:36:57+5:30

मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात आले. सेवाविषयक सदर प्रकरण मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.

Incentives for service matters | सेवाविषयक प्रकरणाने प्रोत्साहन

सेवाविषयक प्रकरणाने प्रोत्साहन

Next
ठळक मुद्देसीईओ सूर्यवंशी यांचा पुढाकार : लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात आले. सेवाविषयक सदर प्रकरण मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. याबाबत महाराष्ट्र राज्य लिपीक वर्गीय संघटनेने त्यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली.
महाराष्ट्र राज्य लिपीकवर्ग संघटनेचे प्रभू मते, केसरीलाल गायधने यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकारी सुर्यवंशी यांची भेट घेतली. मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात कार्यरत कर्मचाºयांचे अनेक प्रकरणे खोळंबले होते. या प्रकरणात कायमतेचा लाभ मंजुरीचा प्रस्ताव, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा पास होण्यापासून सवलत, आश्वासीत प्रगती योजना मंजुरीचा प्रस्ताव, परिविक्षाधीन कालावधी समाप्तीचा प्रस्ताव, संगणक परीक्षा पास होण्यापासून सवलत मिळण्याचा प्रस्ताव, हिंदी, मराठी परीक्षा पास होण्यापासून सवलत, ३१ जुलै २०१७ पर्यंत प्राप्त झालेले वैद्यकीय देय, नियुक्ती मागासवर्गीय प्रवर्गातून झाली असल्यास जात वैधता प्रमाणपत्र आदी प्रकरणांचा समावेश होता. सदर प्रलंबित प्रकरण तात्काळ निपटविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.
यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांनी सहकार्य केले. त्यामुळे दिवाळीपुर्वीच कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने कर्मचाºयांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेवून महाराष्ट्र राज्य लिपीकवर्गीय संघटनेने त्यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले व चर्चा केली. यावेळी नितेश गावंडे, विजय सार्वे, सुधाकर चोपकर, शिवशंकर रगडे, विजय पवार, निशाने, रवी भुरे, पांडूरंग चव्हाण, विखे आदी लिपीकवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Incentives for service matters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.