रोजगार हमी योजनेत शेती कामांचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:31+5:302021-01-24T04:17:31+5:30
रोजगार हमी योजनेतून ग्रामीण मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार व शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होतील. शेतीकरिता शेतकऱ्यांना कमी खर्च करावा लागेल ...
रोजगार हमी योजनेतून ग्रामीण मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार व शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होतील. शेतीकरिता शेतकऱ्यांना कमी खर्च करावा लागेल रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ती कमी होईल. मजुरांना शंभर दिवस काम मिळत नाही. शेतीला रोजगार हमी योजना जोडली गेली तर मजुरांना दोनशे दिवस रोजगार गावातच उपलब्ध होईल. अनावश्यक कामाला खो शेतीच्या कामावर कमी पैसा खर्च होऊ शेतकऱ्यांच्या पैशांची बचत होईल मजुरांना कमी कष्टाची कामे उपलब्ध होतील. शेतीत मजुरांचा मोठा तुटवडा आहे. दुसरीकडे मजुरांना मोठ्या प्रमाणात कामाकरिता वणवण भटकावे लागते. कोरोना काळात मोठ्या संख्येने मजूर वर्ग गावाकडे परत आले आहेत. रोजगार हमीतून त्यांना कामे उपलब्ध झाली तर ते शहराकडे त्यांचे पलायन थांबेल त्यामुळे तत्काळ रोजगार हमीत शेतीसंबंधित कामांचा समावेश करण्याची मागणी माजी सरपंच दिलीप सोनवणे यांनी केली आहे.