महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:39+5:302021-07-30T04:36:39+5:30

राज्यातील १० हजार ५७९ आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात १९६६ पासून महिला परिचर कार्यरत आहेत. अशा महिला परिचरांना तीन हजार ...

Include female attendants in regular service | महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या

महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या

Next

राज्यातील १० हजार ५७९ आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात १९६६ पासून महिला परिचर कार्यरत आहेत. अशा महिला परिचरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. परंतु सदर मानधनात संसाराचा गाडा चालविणे शक्‍य नसल्याने वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी महिला परिचरांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष चंदा नंदनवार, जिल्हा सरचिटणीस सविता हटवार, माधुरी चोले, विना टिचकुले, स्नेहलता रामटेके, अर्चना मेश्राम, मीना हिंगे, रामकला देशमुख, विना टिचकुले यासह इतरांचा समावेश आहे.

या आहेत प्रलंबित मागण्या

महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे, महिला परिचरांना नियमित सेवेत कायम करावे, गणवेश व ओळख पत्र देण्यात यावे, अतिरिक्त कामांचा मोबदला देण्यात यावा, पेन्शन योजना लागू करावी, दरवर्षी गणवेश व भाऊबीज भेट देण्यात यावी, मासिक मानधन दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत देण्यात यावे, चादर, बेडशीट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

290721\img-20210728-wa0143.jpg

photo

Web Title: Include female attendants in regular service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.