संचमान्यतेत शाळा परिचराचे पद समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:53+5:302021-08-01T04:32:53+5:30

महाराष्ट्र राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत असलेले शाळा परिचर कर्मचारी हे ...

Include the position of school attendant in the set | संचमान्यतेत शाळा परिचराचे पद समाविष्ट करा

संचमान्यतेत शाळा परिचराचे पद समाविष्ट करा

Next

महाराष्ट्र राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत असलेले शाळा परिचर कर्मचारी हे शाळा परिसर, कार्यालय तसेच वर्ग खोल्यांची नियमित स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पिरेडनिहाय बेल वाजवून मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितलेले कार्य विहीत कालावधीत विश्वासपूर्वक पार पाडत असतात.

शिक्षण विभागाच्या वतीने २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील जी संचमान्यता देण्यात आली, त्या संचमान्यतेत शाळा परिचराचे पद समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शाळा परिचर स्तरावरील कामे कुणी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळा परिचर कर्मचाऱ्यांची कामे करायची काय, असा प्रश्न निवेदनातून केला आहे.

निवेदनावर विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, देवेंद्र सोनटक्के, होमेंद्र कटरे, खोमेश्वर टोंगे, श्याम वानखेडे, ओमप्रकाश संग्रामे, प्रवीण गजभिये, सचिन तिरपुडे, विनोद नवदवे, सुभाष शेंडे, अशोक काणेकर, नाना गजभिये, ओमप्रकाश धाबेकर, लीलाधर निखाडे, मोहन बोंद्रे, रितेश वासनिक, महेंद्र रहांगडाले, ए. पी. वैद्य, धनंजय बोरकर, चंद्रमणी बागडे, आर. आर. काळे, प्रशांत कोटरंगे, प्रवीण कटरे, हेमराज गोबाडे, एस.डी. नागदेवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Include the position of school attendant in the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.