जिल्ह्यात सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:39 AM2018-12-13T00:39:00+5:302018-12-13T00:39:13+5:30
दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सहा हजार ६४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ४९ विशेष शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सहा हजार ६४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ४९ विशेष शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शारीरिक, मानसिक, श्रवणदोष आणि दृष्टीबाधीतांना सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण दिले जात आहे.
भंडारा जिल्ह्यात सहा हजार ६४८ अक्षमता असलेले विद्यार्थी आढळून आले आहे. हे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच शिक्षण घेत आहेत. २०१८-१९ मध्ये महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेने या विद्यार्थ्यांसाठी ५२ शिक्षकांच्या नियुक्तीला मंजूरी दिली होती. सध्या ४९ विशेष शिक्षक कार्यरत आहेत. हे शिक्षक मानसिक, शारीरिक अक्षमता, श्रवणदोष आणि दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यात असलेल्या विविध शाळांमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्या शाळांवर जावून शिक्षक त्यांना शिकवित आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी बे्रल लिपी पाठ्यपुस्तकांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तर चांगलाच सुधारित आहे. यासोबतच पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतिमाह २५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एकंदरीतच या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड काढून त्यांना सर्व समावेशित शिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांना बे्रेल कीट, व्हिल चेअर, ट्रायसिकल, श्रवणयंत्र, बॅटरी संच, डिजीप्लेअर, कॅलीअर आदींचे वितरण करण्यात आले आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिले जात आहे. यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सहाय्यता भत्ता परिवहन भत्ता, आणि दहा महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे.
-विलास गोंदोळे, जिल्हा समन्वयक समावेशित, शिक्षण जिल्हा परिषद, भंडारा