सवलतीच्या प्रवासातून ११५ कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:09 PM2018-02-07T23:09:02+5:302018-02-07T23:09:24+5:30

प्रवाशांना एसटी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विविध सवलती दिल्या जात आहेत.

Income of 115 crores from discounted journey | सवलतीच्या प्रवासातून ११५ कोटींचे उत्पन्न

सवलतीच्या प्रवासातून ११५ कोटींचे उत्पन्न

googlenewsNext
ठळक मुद्देभंडारा परिवहन विभाग : डिसेंबरपर्यंत सवलतीच्या प्रवासामध्ये साकोली आगार ठरले अव्वल

देवानंद नंदेश्वर।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : प्रवाशांना एसटी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विविध सवलती दिल्या जात आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्यात प्रवाशांकडून सवलतीच्या माध्यमातून ११४.८२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मागील वर्षी हेच उत्पन्न ११० कोटी १८ लाख एवढे होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षात ४ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला सवलतींतून मिळाले आहे.
प्रवाशांना एसटी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी प्रवास भाडे सवलत योजना अलिकडील कालावधीत जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम सर्व व्यवसाय क्षेत्रावर दूरगामी, आमुलाग्र बदल होत असून प्रत्येक व्यवसायीक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या बदलत्या व्यवसायीक परिस्थिीची दखल महामंडळाने घेतलेली असून महामंडळाने प्रवासी हा केंद्रबिंदू ठेवून प्रवाशीवर्गास पूर्ण समाधान देण्याच्या हेतूने महामंडळाने सवलतींचे धोरण निश्चित केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागातर्फे भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे एकूण सहा आगार आहेत. यासह भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी, लाखांदूर, आमगाव, देवरी, लाखनी, मोहाडी, गोरेगाव व अर्जूनी (मोरगाव) या १३ ठिकाणी बसस्थानके आहेत. तसेच भंडारा विभागातंर्गत ५९ प्रवासी निवारे आहेत.
अकोला, शेगाव, वाशीम, परतवाडा, उमरखेड, माहूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, छिंदवाडा, बुलढाणा आदी शहरापर्यत लांब पल्ला वाहतूक चालविण्यात येते.
महामंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या सवलतींच्या माध्यमातून भंडारा विभागाला ११४.८२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला २४ कोटी ५ लाख, गोंदिया आगाराला २३ कोटी ५४ लाख, साकोली २५ कोटी १९ लाख, तिरोडा ११ कोटी ४७ लाख, तुमसर २१ कोटी २३ लाख तर पवनी आगाराला ९ कोटी ३२ लाख रुपयांचा समावेश आहे.
गतवर्षी सन १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या दहा महिन्यात भंडारा विभागाला ११० कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न सवलतींच्या माध्यमातून प्राप्त झाले.
यात भंडारा आगाराला २३ कोटी ३८ लाख, गोंदिया २३ कोटी ५० लाख, साकोली २४ कोटी ८ लाख, तिरोडा १० कोटी ७२ लाख, तुमसर १९ कोटी ७३ लाख तर पवनी आगाराला ८ कोटी ७० लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
या सवलती शासनाकडून दिल्या जात असल्या तरी याची रक्कम महामंडळाला उशिरा प्राप्त होत असते. अनेकदा सवलतींच्या रकमेसाठी राज्य परिवहन मंडळाला सरकारकडे मागणी करावी लागते. मात्र अलिकडे दोन महिन्यानंतर सवलतींची रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला दिल्या जात असल्याचे भंडारा राज्य परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

असे आहेत परिवहन मंडळाच्या सवलतींचे प्रकार
राज्य परिवहन महामंडळामार्फत विविध सामाजिक घटकांना देण्यात आलेल्या प्रवास भाड्यातील सवलतींचे २८ प्रकार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाºया ग्रामीण विद्यार्थिनींसाठी प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत दिली जात आहे. याच प्रमाणे विद्यार्थी मासिक पास सवलत (शैक्षणिक), विद्यार्थी मासीक पास सवलत (तांत्रिक/ व्यावसायिक शिक्षण), विद्यार्थ्यांना मोठ्या सुटीत मुळ गावी जाणे येणे, परीक्षेत जाण्या येण्यासाठी, कॅम्पला जाण्यायेण्यासाठी, आजारी आईवडीलांना भेटण्यास येण्याजाण्यासाठी, विद्यार्थी जेवणाचे डबे, शैक्षणिक स्पर्धा, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेले विजेते स्पर्धक, मुंबई पुनर्वसन केंद्रातून मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहली, रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहल, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, क्षयरोगी, कर्करोगी, कुष्ठरोगी, अंध, अंध साथीदार, अपंग, अपंगासोबत साथीदार, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, स्वातंत्र सैनिक व त्यांचे एक साथीदार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्ती व साथीदार, अर्जुन द्रोणाचार्य, दादाजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू, अपंग गुणवंत पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार तसेच पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचा मान मिळालेले वारकरी दांपत्य यांचा समावेश आहे.

Web Title: Income of 115 crores from discounted journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.