कालव्याच्या अपूर्ण कामाने शेती जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:07 PM2018-07-23T23:07:04+5:302018-07-23T23:07:35+5:30
येथून जवळच असलेल्या मुरमाडी ते विहिरगाव कन्हाळ्याकडे जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्याचे काम अर्धवट सोडून दिल्याने कालव्यातून येणारा मोठा जलप्रवाह जवळच्या शेतामध्ये शिरला. परिणामी लगतची शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. आजही विहीरगाव कन्हाळ्या येथील बºयाच मोठ्या क्षेत्रात पाणी साचून आहे. या शेतीतील बरेचसी रोवणी सडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच रोवणी न झालेल्या क्षेत्रातील पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासरा : येथून जवळच असलेल्या मुरमाडी ते विहिरगाव कन्हाळ्याकडे जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्याचे काम अर्धवट सोडून दिल्याने कालव्यातून येणारा मोठा जलप्रवाह जवळच्या शेतामध्ये शिरला. परिणामी लगतची शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. आजही विहीरगाव कन्हाळ्या येथील बºयाच मोठ्या क्षेत्रात पाणी साचून आहे. या शेतीतील बरेचसी रोवणी सडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच रोवणी न झालेल्या क्षेत्रातील पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कालव्याच्या अर्धवट कामामुळे या शेतीतून पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी या परिसरातील शेकडो एकर शेतीतील धान पिकाचे नुकसान झाले आहे.
यापूर्वी या परिसरातील शेतकरी सन २०१५ ला आपली लेखी तक्रार घेऊन आंबाडी सिल्ली येथील विदर्भ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेले होते. आज हे चित्र पहायला मिळत आहे. या संबंधी विभागाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले होते. तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली. पण शून्य कारवाई झाली नाही. आजही परिस्थिती जैसे थे आहे. अधिकाºयांचा हलगर्जीपणा आजही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.
सध्या या परिसरातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या विळख्यात अडकलेला आहे. शेतकऱ्यांवंर उपासमारी व आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. पाण्याखाली बुडालेल्या शेतीचे शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत.
शासनाने विहिरगाव कन्हाळ्या परिसरातील शेतीचे मोका चौकशी करून नुकसान भरपाई प्रती हेक्टर ५० हजार रूपये याप्रमाणे देण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे हे रखडलेले काम शीघ्र गतीने पावसाळा संपताच पूर्ण करावे, अशीही मागणी केलेली आहे.