अनावश्यक खर्च टाळून शेती उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:52 PM2018-12-07T21:52:42+5:302018-12-07T21:54:04+5:30

शेतकरी मालक झाला पाहिजे. त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती झाली पाहिजे. यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर पोहचवून त्यांचे प्रात्यक्षिक समजावून सांगावे. माती परीक्षण करुनच शेतकऱ्यांनी खते द्यावीत आणि अनावश्यक खर्च टाळून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

Increase agricultural income by avoiding unnecessary expenses | अनावश्यक खर्च टाळून शेती उत्पन्न वाढवा

अनावश्यक खर्च टाळून शेती उत्पन्न वाढवा

Next
ठळक मुद्देमधुकर कुकडे : कृृषी विभागाच्यावतीने सालेभाटा येथे जागतिक मृदा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी मालक झाला पाहिजे. त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती झाली पाहिजे. यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर पोहचवून त्यांचे प्रात्यक्षिक समजावून सांगावे. माती परीक्षण करुनच शेतकऱ्यांनी खते द्यावीत आणि अनावश्यक खर्च टाळून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा, साकोली येथील कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायंस फाऊंडेशनच्या माहिती सेवा केंद्राच्यावतीने आयोजित जागतिक मृदा दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश काशिवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, लाखनी पंचायत समिती उपसभापती मोरेश्वरी पटले, सालेभाटाच्या सरपंच पुष्पलता सोनवाने, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. श्यामकुवर, कृषी विकास अधिकारी संतोष डाबरे, कृषीभूषण शेतकरी शेषराव निखाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी धम्मदीप गोंडाणे, रिलायंसस फाऊंडेशन माहिती सेवाचे सुदर्र्शन वाघमारे, पंचायत समितीचे माजी सभापती मनोज पटले, प्रगतीशील शेतकरी सुरेश बोपचे, तालुका कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार राजेश काशिवार म्हणाले, कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकरीता उपाययोजना करण्याची आज गरज आहे. त्यासाठी जमिनीतील अन्नद्रव्याची तपासणीसाठी मृदा परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. गीतेतील उपदेशानुसार सम्यक आहार झाडाला सुध्दा दिले पाहिजे. उत्तम शेती करायची असेल तर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरली धरण्याची गरज आहे. शेण खताला पर्याय शेणखतच आहे त्यामुळे पशुपालन आवश्यक असून शेतकऱ्यांनी आता व्यवसायिक शेती केली पाहिजे. यश अपयश येतच राहतील, असे आमदार राजेश काशिवार यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मृद तपासणी केलेल्या शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. माती व पाणी परीक्षणावर लोकशाहीर कार्तिक मेश्राम यांनी गीत सादर करुन शेतकऱ्यांना मत्रमुग्ध केले. माती व पाणी परीक्षण करण्याचे आवाहन आपल्या गीतातून त्यांनी केले. तसेच शेतकऱ्यांना मातीचे नमुने कसे घ्यावे याबाबत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ साबळे यांनी करुन दाखविले.
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. वझीरे यांनी तर आभार कृषी विज्ञान केंद्राचे सचित लाकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र साकोली, तालुका कृषी अधिकारी लाखनी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला लाखनी तालुक्याती शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Increase agricultural income by avoiding unnecessary expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.