तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:28 PM2018-09-29T21:28:53+5:302018-09-29T21:30:14+5:30

करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

Increase in fish production through lakes depth | तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देजलयुक्त शिवार : १५ टक्के राखीव जलसाठा, एका तलावापासून पाच लाखांपर्यंतचे उत्पादनाचा लक्षांक

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीही १० किलो मत्स्य जिऱ्यांपासून एकाच १७ एकराच्या तलावात ५ लाखांचे मासोळ्यांचे उत्पादन हाती पडणार असल्याचे मनोगत ढिवरबांधवांनी व्यक्त केले आहेत. करडी परिसरात जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये ल.पा. व मामा तलाव दुरुस्तीची ५ कामे झाली. तर जलसंधारण विभागाचे वतीने ल.पा. व मामा तलावांचे २ कामे झालीत. सन २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव (करडी), बोरी-पांजरा, देव्हाडा बुज., नरसिंगोला आदी गावात जलयुक्तची कामे झालीत तर सन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रुपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज., जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे २००१.३ टीसीएम जलसाठा तयार होवून सुमारे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.करडी परिसरातील सर्व तलाव कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असल्याने जंगलातील पाणी तलावात मोठ्या प्रमाणात साठविले गेले. साठलेल्या पाण्याचा उपयोग ढिवरबांधवांसाठी वरदान ठरले. केसलवाडा, जांभोरा टोला व करडी गावातील मत्स्य उत्पादक सहकारी संस्थांनी तलावांची क्षमता ओळखून रोहा, कतला, काटवे, मिरगल, सिपनस, वाघुळ आदी मासोळ्यांचे मत्स्य जिरे टाकले. नैसर्गिक गवत व हिरवा चारा तलावात उगवल्याने तसेच जास्त काळ पाणी साठा राहिल्याने मागील वर्षीपासून मासोळ्यांचे वरघोष उत्पन्न हाती पडत आहे. यावर्षी केसलवाडा येथील ढिवरबांधवांनी पालोरा येथील १७ एकरमध्ये विस्तारलेल्या बांध तलावात १० किलो मत्स्य जिऱ्यांचा चांगला विस्तार झालेला आहे. मासेमारीतून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा विश्वास ढिवरबांधवांनी व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पालोरा, करडी व जांभोरा जंगल परिसरातील तलावांचे एक ती दीड मिटरपर्यंत खोलीकरण झाले. यामुळे मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यावर्षी बांध तलावातील १० किलो मत्स्य जिऱ्यापासून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीपासून मासोळ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झालेली आहे.

Web Title: Increase in fish production through lakes depth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.