निमगाव पालांदूर रस्त्यावरील पुलाची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:02+5:302021-05-09T04:37:02+5:30
: पालांदूर ते निमगाव या चार किलोमीटरच्या रस्त्यावरील नाल्यावर गत २५ वर्षांपूर्वीपासून ये-जा करण्यासाठी पूल केला आहे. हा पूल ...
: पालांदूर ते निमगाव या चार किलोमीटरच्या रस्त्यावरील नाल्यावर गत २५ वर्षांपूर्वीपासून ये-जा करण्यासाठी पूल केला आहे. हा पूल आता धोकादायक स्थितीत बनला आहे. या पुलाची उंची वाढविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. निमगाववासीयांनी पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली आहे.
निमगाव/पालांदूर या रस्त्यावरील पुलाची उंची अत्यंत कमी असून, रस्ते उंच असून, पूल खाली गेलेला आहे. पावसाळ्यात विद्यार्थी वर्गासह शेतकरी बांधवांना जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडावा लागतो. डोळ्यांसमोर संकट दिसत असूनही दुसरा मार्गच नसल्याने याच पुलावरून प्रवास करावा लागतो. निमगावच्या गावकऱ्यांना पालांदूरशिवाय दुसरी मोठी बाजारपेठ नाही. आरोग्यासह इतर घटकासाठीसुद्धा पालांदूरला नियमित यावेच लागते. अशा प्रसंगी पुलावर पाणी राहत असूनही जीव धोक्यात घालून यावे लागते. त्यामुळे लवकर या पुलाचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे. पालांदूर परिसरात सगळ्यात प्रथम याच पुलावर पाणी चढते. पोलिसाचा बंदोबस्त लावला जाते. विद्यार्थी वर्गांची विशेष काळजी घेण्याकरिता गावकरी जागरूक राहतात. तेव्हा बांधकाम विभागाने शक्य तितके लवकर या पुलाचे काम हाती घ्यावे. असे निवेदन श्याम चौधरी यांनी दिले आहे. या पुलाच्या अनुषंगाने बांधकाम विभागाला यापूर्वी सूचना दिलेली आहे.