विषाणूजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:00 PM2019-07-04T22:00:20+5:302019-07-04T22:00:39+5:30
गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
भंडारा जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अधून-मधून कोसळणाºया पावसांच्या सरींमुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडत होती. त्यामुळे पावसात अनेकदा भिजावे लागत असल्याने त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होत आहे.
'गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसात भिजल्याने अनेकांना सर्दी झाली आहे. त्यामुळे ताप, खोकलादेखील येऊ लागला आहे. त्याशिवाय उलट्या, जुलाब होत आहेत. विषाणूजन्य ताप असल्याने तो आठ दिवस राहतो. तापामुळे डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा वाढत आहे.
सर्दी, खोकला तसेच तापाची ही लक्षणे लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहेत. कफ वाढल्याने दम्याच्या रुग्णांना त्रास होत आहे. रुग्णाला चक्कर येणे, सांधे दुखणे ही नवी लक्षणे दिसून येत आहेत. सध्याचे हवामान खराब आहे. विषाणूंचे हवेतील प्रमाण वाढत आहे. पावसात भिजल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. पावसात डोके भिजल्याने डोकेदुखी, सर्दी, त्याशिवाय हात पाय दुखायला सुरुवात होते. शहरासह जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे.
पावसाळ्यात विषाणुजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, दुषित पाणी व अन्नाद्वारे होणारे आजार जसे टायफाईड, कावीळ, जुलाब आदी बळावण्याची शक्यता जास्त असते. त्यात लहान बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने आजार सहज होऊ शकतात. यासाठी पुर्ण बाह्याची कापडे घालणे, डास व इतर किटकांपासून बचावासाठी मच्छरदानीचा वापर करणे, परिसरात पाणी जमा होवू न देणे, अन्नपदार्थ झाकुन ठेवणे तसेच उघड्यावरील खाद्यान्नाचे सेवन टाळणे, उकळुन थंड केलेले पाणी प्यायला देणे. प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला आहे. बाळांना वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसी लावुन घेणे. रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार करावा.
-डॉ. यशवंत लांजेवार,
बालरोग तज्ज्ञ, सिटीकेअर मल्टीस्पेशिआलिटी हॉस्पिटल, भंडारा.