भविष्याचा वेध घेऊन पक्ष वाढवा
By admin | Published: January 4, 2017 12:45 AM2017-01-04T00:45:39+5:302017-01-04T00:45:39+5:30
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद व नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली.
प्रफुल्ल पटेल : नगरपरिषदेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
भंडारा : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद व नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली. जुन्या वर्षाच्या कॅलेंडरनंतर नवीन वर्षाचे कॅलेंडर सुरु होते. त्याचप्रमाणे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भविष्याचा वेध घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा येथे नगर परिषदच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी भंडारा आले असता ते कार्यकर्त्याशी बोलत होते. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी खा.प्रफुल्ल पटेल आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी खासदार पटेल यांनी नगरपालिकेच्या आजी व माजी नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे विसरून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करावे तसेच पवनी क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्यांकरिता राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी खंबीर पाठीशी उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवडणुकीत सर्वांनी आपापली जबाबदारी सांभाळली. मात्र पक्षाने केलेले कार्य पोहचविण्यात कमीपणा राहिल्याने निवडणुकीत पक्ष माघारला अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी नितीन तुमाने, लोमेश वैद्य, डॉ.विजय ठक्कर, मोहन सूरकर, मुकेश बावनकर, यादव भोगे, शोभना गौरशेट्टीवार, महेंद्र गडकरी, चौसरे, शहजाद बेग शालू, अभिषेक कारेमोरे, कैलाश नशिने, भगवान बावनकर, डॉ.विनयमोहन पशिने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)