पळसगाव परिसरात रेती चोरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:54+5:302021-02-07T04:32:54+5:30

पळसगाव सोनका या गावातून रात्री डंपिंग काढून रेतीचा उपसा केला जात आहे. रेती जास्त किमतीने गोंदिया जिल्ह्यात पाठविली जात ...

Increase in sand theft in Palasgaon area | पळसगाव परिसरात रेती चोरीत वाढ

पळसगाव परिसरात रेती चोरीत वाढ

Next

पळसगाव सोनका या गावातून रात्री डंपिंग काढून रेतीचा उपसा केला जात आहे. रेती जास्त किमतीने गोंदिया जिल्ह्यात पाठविली जात आहे. पवारटोली, महालगाव, परसोडी, गोंडउमरी, उमरी व भोजू घाट या सर्वच घाटांतून रात्री रेतीचा उपसा केला जात आहे. मात्र, येथील तलाठी ऑफिसमध्ये वेळेवर येत नाही. त्यामुळेच शासकीय यंत्रणा कुचकामी झालेली आहे. तसेच गोंडउमरी येथील तलाठी रात्री जाण्यात टाळत आहेत. पळसगाव घाटावरती पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी, अशी गावातील मंडळींची मागणी आहे. अनेक दिवसांपासून या भागात रेतीमाफियांकडून रेतीची दिवसा व रात्री चोरी होत आहे. मात्र, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्या याकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाची प्रशासनाच्या तिजोरीला लाखो रुपयांचा चुना लागलेला आहे. गावातून चालणारे ट्रॅक्टर, टिपर यामुळे व गावकऱ्यांची झोप उडत आहेत. गत अनेक दिवसांपासून ही रेती नैनपूर पापडाची, टोला, नवेगाव बांध मार्गाला जात आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्याचे अधिकारी वर्ग हे पकडून कारवाई करीत असतात. भंडारा जिल्ह्यातील अधिकारी व साकोली तालुक्यातील तलाठी मात्र निष्क्रिय ठरलेले आहेत. त्या कर्मचाऱ्यांपासून कारवाई शून्य दिसत आहे. आजपर्यंत रेतीमाफियाकडून कुठली केस झालेली नाही. तसेच तहसीलदार या भागाला चौकशी करीत नाहीत आणि त्यामुळे प्रशासनाच्या तिजोरीला करोडो रुपयांचा चुना लागलेला आहे. तसेच बैलगाडीच्या साह्याने रेतीची सर्वाधिक वाहतूक होत आहे. मात्र, बैलगाडीवर कुठलीही कारवाई केली जात नाहीत, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये बैलगाडीवर सुद्धा कारवाई केली जात आहे.

Web Title: Increase in sand theft in Palasgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.