३३ गावांत ५५०० हेक्टर क्षेत्रात वाढले शेती सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:36 PM2018-10-01T21:36:02+5:302018-10-01T21:36:18+5:30
जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन तयार झाले. या पाण्यामुळे खरीपाची धानाची शेती पिकण्यास मोलाची मदत मिळाली.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन तयार झाले. या पाण्यामुळे खरीपाची धानाची शेती पिकण्यास मोलाची मदत मिळाली. एका पाण्याचा दुष्काळ कायमचा संपला.
मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सन २०१५ ते १८ या तीन वर्षात झालेल्या कामांमुळे पारंपारिक सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती निर्माण झाली. नवनिर्माणाबरोबर सुधारणा व जलजागृतीमुळे पाण्याचा ताळेबंद निर्माण होवून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व व वापराचे नवे तंत्र कळले आहे. उत्पादनात मोठी वाढ पहावयास मिळाली आहे.
गतवर्षी १०००१ टीसीएम जलसाठ्याची निर्मिती
सन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसºया टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रूपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज, जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे १००१.३ टीसीएम जलसाठा तयार होण्यास मदत मिळाली. झालेल्या कामातून अंदाजे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.
२०१५-१६ मध्ये २७३९ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढले
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सन २०१५-१६ मध्ये मोहाडी तालुक्यातील करडी, मोहगाव करडी, बोरी पांजरा, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा बुज, नरसिंगटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी, खैरलांजी आदी १५ गावात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ३१२ कामे करण्यात आली. यावर सुमारे ९०१.६७७ लक्ष रूपयांचा खर्च करण्यात आला. यातून सुमारे ३४०४.६३४ टीसीएम जलसाठा तयार होवून २७३९.२४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन निर्माण झाले.
२०१६-१७ मध्ये १९०९ क्षेत्र सिंचन वाढले
सन २०१६-१७ मध्ये दुसºया टप्प्यात महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धुसाळा, धोप, ताडगाव, जांब आदी १० गावांची निवड होवून ३३३ कामे करण्यात आली. याकामांवर सुमारे ५३२.४ लक्ष रूपये खर्च होवून सुमारे २२०६.३६ टीसीएम जलसाठा निर्माण होण्यास मदत मिळाली तर नवनिर्माणामुळे १९०१.६३ हेक्टर क्षेत्र सिंचनक्षम झाले.
जलयुक्त शिवारमुळे शेतशिवार पाणीदार झाले. यावर्षी सप्टेंबरमध्ये धानाचे पीक फुलोºयावर असताना सुमारे २३ दिवस पावसाचा खंड पडल्याने याच पाण्याचा वापर शेतकºयांनी डिझेल इंजिनचा वापर करून केला. तसेच तलावाचे गेट सुरू करून शेतीचा दुष्काळ संपविला. यावर्षी धानाचे हेक्टरी उत्पादन वाढणार आहे.
-निशिकांत इलमे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष
जलयुक्त शिवार योजनेमुळे तीन वर्षात ३३ गावातील एका पाण्याचा दुष्काळ संपला. खरीपातील धानाची व ऊसाची शेती बहरली असून उर्वरित पाण्याचा उपयोग रब्बीच्या पिकासाठी होणार आहे.
-निमचंद्र चांदेवार, मंडळ कृषी अधिकारी, मोहाडी