वाढते अतिक्रमण ठरले व्यापाºयांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:40 PM2017-10-26T23:40:21+5:302017-10-26T23:40:35+5:30
टि-पाँईटवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत लाखांदुरच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाºया व्यापाºयांना फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : टि-पाँईटवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत लाखांदुरच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाºया व्यापाºयांना फटका बसत आहे. महिण्यामागे नगरपंचायतला ५०० रुपये कर देऊन व्यवसाय करत असतांना, गाळ्यांसमोरील जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटून व्यवसाय करणाºया दुकान चालकांमुळे कर देणाºया दुकान चालकांना मनस्ताप होत असून त्यांच्या व्यवसायावर फटका बसत आहे.
चार वर्षापूर्वी जिल्ह्याला सचिंद्रप्रतापसिंग हे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी अतिक्रमण हटाव म्ेोहीम हाती घेतली होती. तेव्हा लाखांदूर टि-पाँईंट येथील अतिक्रमण हटविले होते. तेव्हा गाळ्यांमधील ेव्यावसायीकांना सुगीचे दिवस आले होते. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. कर देणाºया व्यापाºयांनी अनेकदा ग्रामपंचायतकडे ही समस्या लेखी स्वरूपात दिली. ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर सुध्दा या व्यापºयांनी निवेदन दिले. मात्र नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिण्यामागे ५०० रुपये कर देऊनही अतिक्रमण धारकांमुळे व्यवसायावर होणाºया परीणामाची नगरपंचायतला जाणिव होत नाही. व्यवसायीकाकडून नाराजीचा सुर निघत आहे.
शिवस्मारकाच्या नियोजीत जागेवर होर्डिंग व बॅनर
गेल्या काही वर्षापुर्वी लाखांदूर येथे शिवस्मारक उभारण्याकरीता टि-पाँईंटवर जागा नियोजित करुन फलकाचे अनावरण देखील करण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने शिवस्मारकाच्या नियोजीत जागेवर राजकीय पक्षांचे तसेच विविध कार्यक्रमाचे होडींग व बँनर लावण्यात येत आहेत.