वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:04 AM2019-06-15T00:04:14+5:302019-06-15T00:06:50+5:30

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.

Increment in old age pension scheme | वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात वाढ

वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात वाढ

Next
ठळक मुद्देदिलासा : २०० रुपयांवरुन मानधन ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.
वृध्दांना आयुष्याच्या सायंकाळी सन्मानाने जगता यावे. यासाठी शासन त्यांना निवृत्तीवेतन देते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राज्यात राबविली जात आहे.
यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत अगदी तुटपूंजे मानधन दिले जाते. वेळोवेळी केंद्र शासनाने या योजनांमध्ये सुधारणाही केल्या आहेत. त्यांची अमंलबजावणी राज्य शासनाने केली आहे. वयाच्या ८० वर्षावरील वृध्दांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेंतर्गत आतापर्यंत २०० रुपये मासिक मानधन दिले जात होते. त्यात ३०० रुपयांची वाढ करुन आता सदर मानधन प्रतीमाह ५०० रुपये करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ४० ते ६५ वर्षाखालील महिलांना दरमहा २०० रुपये दिले जात होते. आता या योजनेसाठी ४० ते ७९ वर्ष असे वय करण्यात आले असून प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगनिवृत्ती वेतन योजनेसाठी सध्या १८ ते ६५ वर्षाखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. त्यात बदल करुन १८ ते ७९ असे करुन २०० रुपयांऐवजी आता प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार आहे.
सदर योजनेचे मानधन महागाईच्या काळात अगदी तुटपूंजे असले तरी आयुष्याच्या सायंकाळी ही रक्कमही मोठी असते. आजारपण व विविध कारणात ही रक्कम वृध्दांना आधार ठरते. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो वृध्दांना मिळणार आहे.

Web Title: Increment in old age pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.