स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साता समुद्रापार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:02+5:302021-08-19T04:39:02+5:30

बर्लिन येथे भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सायकल व कार रॅलीला झेंडी दाखविली. या रॅलमध्ये ५० कार व २०० सायकलस्वारांनी ...

Independence Day nectar festival celebrated overseas | स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साता समुद्रापार साजरा

स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साता समुद्रापार साजरा

Next

बर्लिन येथे भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सायकल व कार रॅलीला झेंडी दाखविली. या रॅलमध्ये ५० कार व २०० सायकलस्वारांनी भाग घेतला. रॅली भारतीय दूतावासापासून विविध मार्गांनी जाऊन पुन्हा दूतावासासमोर आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यानंतर, मराठी कुटुंबासाठी छोटेखानी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल-ताशा व लेझीम पथकाने मराठमोळी संस्कृतीची छाप सोडली. उपस्थित जर्मन प्रेक्षकांना त्याची भुरळ पडली. रमणबाग ढोल पथकाने परदेशातील मराठी तरुण आजही भारतीय वाद्य परंपरेचा झेंडा अभिमानाने रोवत असल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमासाठी मराठी मित्र मंडळाचे दीपक पाटील, रोहित प्रभू, अमोल सैनिस, सानिका बर्वे, भंडारा येथील मयूर साठवणे, अपर्णा साठवणे यांच्यासह सागर पाटील, अमित सोमानी, देवेंद्र व्यवहारे, गणेश सोनावणे, संदीप होळवे, अमित चौगुले, अमोल व्यवहारे, नीतेश गायकवाड, आशिष गंगाळे, समीर कुळकर्णी यांनी सहकार्य केले.

बाॅक्स

महाराष्ट्रीयन वेशभूषेने वेधले लक्ष

साता समुद्रापारही आपली संस्कृती आणि परंपरा टिकविण्याचा प्रयत्न मराठी तरुणांनी केला आहे. बर्लिन मराठी मित्रमंडळाच्या लेझीम पथकाने तर धमाल केली. तरुणी परंपरागत महाराष्ट्रीयन वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. निळ्या आणि केशरी रंगाचे नऊवारी परिधान करून लेझीम खेळल्या, तेव्हा उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Web Title: Independence Day nectar festival celebrated overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.