केंद्रप्रमुखांच्या समस्या सोडविण्यास शासन, प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:54+5:302021-09-14T04:41:54+5:30

या प्रसंगी राज्य मुख्य संघटक अशोक खेताडे, तालुका अध्यक्ष प्रदीप काटेखाये, सहसचिव भीमराव मेश्राम, सुभाष ...

The indifference of the government and administration to solve the problems of the head of the center | केंद्रप्रमुखांच्या समस्या सोडविण्यास शासन, प्रशासनाची उदासीनता

केंद्रप्रमुखांच्या समस्या सोडविण्यास शासन, प्रशासनाची उदासीनता

Next

या प्रसंगी राज्य मुख्य संघटक अशोक खेताडे, तालुका अध्यक्ष प्रदीप काटेखाये, सहसचिव भीमराव मेश्राम, सुभाष मुकूरणे, सुधाकर कंकलवार, एस.जी. कांबळे, जयंत उपाध्ये, सुरेश मोहबंशी, सुरजलाल शरणागते, नामदेव गभने उपस्थित होते. यात केंद्रप्रमुखांचे गत २५ वर्षांपासूनचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील केंद्रप्रमुखांशी चर्चा करण्यात आली. केंद्रप्रमुखांची पदे तांत्रिक सेवेत आणण्यात यावी, अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे, वर्ग २ मध्ये पदोन्नतीची संधी देण्यात यावी, केंद्रप्रमुखांची पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के सरळसेवेने भरण्यात यावी, पदोन्नतीची एक वेतनवाढ मिळावी, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदे केंद्रप्रमुखांतून भरण्यात यावी, जिल्हा शिक्षण समितीवर केंद्रप्रमुख प्रतिनिधी नेमण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना देण्यात येईल. मागण्या मान्य न झाल्यास २८ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्याचा व शासनास मागण्या पूर्ण करण्यासाठी शिफारस पत्र घेणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन अशोकराव महाले यांनी केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख संघटनाचे जिल्हाध्यक्ष वसंत साठवणे यांनी केले. संचलन प्रमोदकुमार अणेराव यांनी केले. आभार गिरधारी भोयर यांनी मानले.

Web Title: The indifference of the government and administration to solve the problems of the head of the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.