ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:43 PM2017-08-19T23:43:16+5:302017-08-19T23:44:06+5:30

अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटना, तुमसर तालुक्याच्या वतीने तुमसर डाक कार्यालयासमोर १६ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.

Ineligible property of rural postmen | ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

Next
ठळक मुद्देविविध मागण्या : कर्मचाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटना, तुमसर तालुक्याच्या वतीने तुमसर डाक कार्यालयासमोर १६ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.
सर्कल अध्यक्ष पी.टी. सिंगाडे यांच्या नेतृत्वात तुमसर डाकसेवक कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला असून तुमसर डाकघर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन १६ आॅगस्टपासून सुरू केले आहे.
डाकसेवकांच्या मागण्यांमध्ये जीडीएसला आठ तासांचे करणे, विभागीकरण करणे, जीडीएस यांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, वैद्यकीय सुविधा पुरविणे, सीजीएस व ईएसआय योजनेत डाकसेवकांचा समावेश करणे, शाखा डाक घरांना एबीसीडी आधारावर वर्गीकरण करणे, संयुक्त कार्य शिफारशी लागू न करणे, एल डब्ल्यू सुट्टीवर कोणतीही अट लागू न करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
सदर संपात सर्कल उपाध्यक्ष पी. टी. शिंगाडे, पी.बी. टेकाम, आर.आर. बोंदरे, एम.आर. जाऊळकर, एस.एम. शेख, सी.वाय. सोलंकी, आर.जी. मडावी, सी.जे. गौपाले, व्ही.जी. कापसे, एस.व्ही. कुंभलकर, जे.एस. सार्वे, डी.जी. चव्हाण, एस.बी. डोंगरे, ए.डी. कोळवते, एम.सी. गजभिये, आर.पी. गजभिये, ए.डी. कांबळे, एम.बी. टालने, के.डी. कटरे, एन.जी. सोलंकी, जे.टी. शेख, आर.डी. बघेल, सी.एच. बांगरे, पी.जी. देशभ्रतार, हरीश श्रीगामे, एम.एस. चोपकर, सुरेखा गहाणे, रामप्रसाद गौपाले, योगेश धारगावे, सुरेंद्र गौपाले, एस. आर. कोतपल्लीवार यांचा समावेश आहे. डाकसेवकांच्या आंदोलनामुळे डाक ग्राहकांना अडचणी निर्माण झाल्या आहे.

Web Title: Ineligible property of rural postmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.