घर बांधकामाला बसली महागाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:33 AM2021-02-07T04:33:20+5:302021-02-07T04:33:20+5:30
भंडारा जिल्ह्यात रियल इस्टेटचा मोठा कारभार आहे. परंतु जीएसटी आणि नोटबंदीनंतर या क्षेत्रात मंदी जाणवली. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आली ...
भंडारा जिल्ह्यात रियल इस्टेटचा मोठा कारभार आहे. परंतु जीएसटी आणि नोटबंदीनंतर या क्षेत्रात मंदी जाणवली. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आली असतानाच १० महिन्यांपूर्वी कोरोना संसर्गामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी जाणवली. अनेक ठिकाणचे बांधकाम बंद झाले. घरकुल बांधकामासह सार्वजनिक ठिकाणी होत असलेले बांधकाम ही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. परिणामी बांधकाम साहित्य ही तसेच पडून होते. लाॅकडाऊनपूर्वी असलेले बांधकाम साहित्याचे दर आता त्यात वाढ झाली आहे. वाळू, विटा, स्टील आणि सिमेंटच्या भावात वाढ झाल्याने अनेकांचे घर बांधकामाचे बजेट वाढले आहे. दुसरीकडे मजुरीतही किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र अनेकांचे बांधकाम कंत्राट स्वरूपात असल्याने त्याचा काही एवढा परिणाम दिसून येत नाही. एकंदरीत बांधकाम साहित्यांच्या झालेल्या दरात वाढीमुळे बांधकाम महागले, असे म्हणता येईल. भंडारा जिल्ह्यात वाळूचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.