पाहुणचारावर महागाईचे सावट

By admin | Published: November 16, 2015 02:06 AM2015-11-16T02:06:41+5:302015-11-16T02:06:41+5:30

दिवाळीनंतर आता घरी येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. सर्वांच्याच घरात पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ही परंपराच आहे.

Inflation of inflation on hospitality | पाहुणचारावर महागाईचे सावट

पाहुणचारावर महागाईचे सावट

Next

भंडारा : दिवाळीनंतर आता घरी येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. सर्वांच्याच घरात पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ही परंपराच आहे. मात्र भाज्यांच्या वधारलेल्या दरामुळे पाहुण्यांच्या पाहुणचारावर ग्रहण लागले आहे. बाजारात ४० रूपयांच्या आत भाज्यांचे भाव नसल्याने कायखरेदी करावे असा प्रश्न उभा आहे. यामुळेच दोन वेळच्या जेवणाच्या ताटातून भाजी गायब होऊ लागली आहे.
नगर परिषद, जिल्हा परिषदसह काही खाजगी शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे पालक आपल्या सुट्या अरेंज करून बाहेरगावी नातेवाईंकाकडे सुट्या एंजॉय करायला गेले आहेत. तर बहिणी भाऊबीजेनिमित्त आपल्या माहेरी आल्या आहेत. यामुळे प्रत्येकांच्याच घरात पाहुण्यांची रेलचेल आताही दिसून येत आहे. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना व बहिणींना पाहुणचार आलाच. ही परंपराच आहे. मात्र बाजारात भाज्यांचे दर ऐकताच जिवाला धडकीच भरणार अशी स्थिती आहे. बाजारात रविवारी भाज्यांचे भाव जाणून घेतले असता, सर्वात स्वस्त भाजी पानकोबीच २0 रुपए प्रती किलो दराने विकली जात होती. तर अन्य भाज्या मध्ये कांदे, टमाटर, लवकी, पालक, लाल भाजी, चवळी भाजी, सुरण, कोहळा ३0 रुपए प्रती किलो; बटाटे, वांगे, टोंढरे, काकडी, मुळा, रुपए २० ते ३० प्रती किलो; कारले, गुहिया, हिरवी मिरची, भेंडी, गवार शेंग, ढेमसे, शिमला, परवर, गाजर, दोडके, मेथी, ओला कांदा, चवळी शेंग- ४० ते ६० रुपए प्रती किलो; वालाची शेंग- ६० रुपए प्रती किलो; आलं, वटाण्याची शेंग (मटर) - ८० रुपए प्रती किलो तर लसण व कोथींबीर - ८० रुपए प्रती किलो दराने विकले गेले. (प्रतिनिधी)

Web Title: Inflation of inflation on hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.