माहिती हीच शक्ती

By admin | Published: March 19, 2016 12:27 AM2016-03-19T00:27:43+5:302016-03-19T00:27:43+5:30

आजच्या युगात माहिती हीच खरी शक्ती असून माहितीचे भांडार स्वत:वर असेल तर आपण आपला तसेच देशाचा विकास साधू शकतो, ...

Information is the power | माहिती हीच शक्ती

माहिती हीच शक्ती

Next

विशेष प्रचार कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
भंडारा : आजच्या युगात माहिती हीच खरी शक्ती असून माहितीचे भांडार स्वत:वर असेल तर आपण आपला तसेच देशाचा विकास साधू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्या वतीने आज लाखनी येथे आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी लाखनी पंचायत समितीच्या सभापती रजनी आत्राम, अग्रणी जिल्हा बँक, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक संजय पाठक, नागपूर क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती गावांपर्यत आणि प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचणे आवश्यक असून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजीटल इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मोबाईलद्वारे पोहचविण्यात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी दिली.
शेती सोबतच शेतीला पुरक असणाऱ्या व्यवसायाकडे लोकांनी वळण्याचे आवाहन करुन जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, आंध्र प्रदेशातील शेतकरी शेती सोबतच इतरही व्यवसाय करीत असून इतरही व्यवसाय करीत असून इथे सुध्दा मत्स्यपालन तसेच इतर व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळल्यास त्यांना आर्थिक मदत होईल. राज्य सरकारने मागेल त्याला शेततळी ही योजना लागू केली असून याबाबतही शेतकऱ्यांनी पुढे येवून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी केले.
रजनी आत्राम यांनीलेक वाचवा लेक शिकवा असे सांगून मुलांना शिक्षणासाठी सर्वांनी प्रोत्साहन करण्याचे आवाहन केले. यावेळी दिशा गद्रे, गिरीधर टेरे यांनी कौशल्य विकास, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक संजय पाठक यांनी पंतप्रधानाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच विस्तार माध्यम अधिकारी एन. आर. पाखमोडे यांनी विचार व्यक्त केले. प्रस्ताविक मनोज सोनोने यांनी केले.
यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आज सकाळी लाखनीच्या जि. प. गांधी विद्यालयाच्या प्रांगणातून जनजागरण रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास नागपूरच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहाय्यक रामचंद्र सोनसळ तसेच वर्धा येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहाय्यक संजय तिवारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Information is the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.