पर्यटन विकासातून ग्रामविकासाला चालना
By admin | Published: May 29, 2017 12:22 AM2017-05-29T00:22:22+5:302017-05-29T00:22:22+5:30
पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा लाभ पर्यटन व ग्रामविकासाला मिळेल. असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.
नाना पटोले यांचे प्रतिपादन : सिरसाळा येथे पर्यटन विकास योजनेचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा लाभ पर्यटन व ग्रामविकासाला मिळेल. असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.
पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे पर्यटन विकास योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामवन समिती सिरसाळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी शासनाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमातून हा विकास होऊ घातला आहे. भंडारा वनविभागाअंतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. समिती व प्रशासनाच्या सहकार्यातून विकास शक्य होईल. असे प्रतिपादन यावेळी पटोले यांनी केले. कार्यक्रमाला समिती सदस्य, वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.