यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:42+5:302021-07-10T04:24:42+5:30

बॉक्स दोनशे एकरवर यांत्रिकीकरणाने करणार धान लागवड तुमसर तालुक्यातील सिंधपुरी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने परिसरातील दोनशे एकर क्षेत्रावर ...

Initiative of a farmer producer company for mechanization of paddy cultivation | यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार

यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार

Next

बॉक्स

दोनशे एकरवर यांत्रिकीकरणाने करणार धान लागवड

तुमसर तालुक्यातील सिंधपुरी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने परिसरातील दोनशे एकर क्षेत्रावर यांत्रिकीकरणाने धान लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष पवन कटणकार तसेच सचिव रवी रहांगडाले यांनी यांत्रिकीकरण धान शेतीचा ध्यास घेतला असून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी त्यांनी आतापर्यंत सेंद्रिय शेती, गांडूळ निर्मिती प्रकल्प तसेच अन्य विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून शेतकरी विकास करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या नावीन्यपूर्ण प्रयोगाची राज्यस्तरावर नक्कीच दखल घेतली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोट

पारंपरिक शेतीने धान लागवड केल्यास शेतकऱ्यांना धान शेतीचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी येते. मात्र सीड ड्रीलच्या साह्याने अथवा यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास उत्पादन खर्चात प्रचंड बचत होऊन उत्पादनात मोठी वाढ होते. यासाठी आमच्या तुमसर शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे यासाठी पुढाकार घेतला आहे.

रवी रहांगडाले, सचिव, शेतकरी उत्पादक कंपनी तुमसर.

कोट

पारंपरिक शेतीचे दिवस गेले आहेत. शेतकऱ्यांनी काळानुसार बदल करणे गरजेचे आहे. शेती व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. मात्र गरज आहे ती शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक बदल, कृषी विभागाचे मार्गदर्शन स्वीकारण्याची. यासाठी आम्ही परिसरातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून माहिती देत आहोत.

- पवन कटणकार, अध्यक्ष शेतकरी उत्पादक कंपनी, तुमसर

Web Title: Initiative of a farmer producer company for mechanization of paddy cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.