अन्यायग्रस्त ठेवीदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:19 PM2018-11-16T22:19:37+5:302018-11-16T22:19:55+5:30

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Injustice Depositors Front | अन्यायग्रस्त ठेवीदारांचा मोर्चा

अन्यायग्रस्त ठेवीदारांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देकोट्यवधींची फसवणूक : जेएसव्ही डेव्हलपर्स, जय विनायक बिल्डकॉर्पचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सदर कंपनीने भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दामदुप्पट रकमेचे प्रलोभन देऊन २५ हजार कोटी रूपयांनी फसवणूक केली आहे. सदर कंपनीच्या संचालकांविरोधात ६ सप्टेंबर २०१६ रोजी भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून करण्यात आला. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली तर अनेकजण आजही पोलिसांच्या हाती लागले नाही. जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्याची मागणी करात नागपूर हिवाळी अधिवेशनावर दोनदा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी भंडारा अप्पर जिल्हाधिकाºयांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.
मात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कुठलही कार्यवाही केलेली नाही. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही. अखेर ठेवीदारांनी येथील हुतात्मा स्मारक चौकातू जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, मधुकर येरपुडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्यात ठेवीदाराची रक्कम तात्काळ परत देण्याची कार्यवाही करवी, पसार आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाºया २०१९ च्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ठेवीदार बहिष्कार घालतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी सदर प्रकरण समजून घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनाला पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरात लवकर रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्च्याचा समारोप करण्यात आले. यावेळी डॉ. राजकुमार बावणकर, ममता सांडेल, अनिता मुर्ती, नलु सेलोकर, ममता साखरे, केशोराव बिसने, ज्ञानेश्वर गजभिये या ठेवीदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्च्याला यशस्वीतेयसठी फुलवंता कोकुडे, जागृती गजभिये, मंगला सातके, अरविंद प्रधान, पुष्पा पटले, जगदीश जनबंधू, लेकचंद लुसेसरी यांनी परिश्रम घेतले. मोर्चात अनेकजण सहभागी झाले होते.

Web Title: Injustice Depositors Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.