अधिकाऱ्यावर शाई फेकली

By admin | Published: July 30, 2015 12:46 AM2015-07-30T00:46:13+5:302015-07-30T00:46:13+5:30

अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करणे किंवा चुकीचे आरोप करुन बदनामी करण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.

Ink poured on the officer | अधिकाऱ्यावर शाई फेकली

अधिकाऱ्यावर शाई फेकली

Next

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन
भंडारा : अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करणे किंवा चुकीचे आरोप करुन बदनामी करण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणाच्या आरोपानंतर २८ जुलै रोजी पुन्हा एका अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई टाकून त्यांची मानहानी करण्याचा व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन संबंधितांना अटक करावी, जेणेकरुन अशा बाबींना आळा बसेल यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक बा.सु. मरे हे काल मंगळवारला आपल्या कार्यालयात कामकाज करीत होते. त्यावेळी सुशिक्षित बेरोजगार सोसायटीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भूपेंद्र मिश्रा हे कार्यालयात मरे यांना भेटायला आले. त्यांनी जिल्हा माहिला व बाल विकास कार्यालयात कामासाठी ५ ते ६ लोकांची मागणी केली होती.
त्या कामाबाबत काय झाले अशी मरे यांना विचारणा केली. मात्र विभागाने दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता न केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव परत पाठविल्याचे सहाय्यक संचालक मरे यांनी मिश्रा यांना सांगितले. त्यावर मिश्रा यांनी तुम्ही इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालता असे आरोप करीत पिशवीमधून काळया रंगाची शाईची बॉटल काढून मरे यांच्या चेहऱ्यावर व कपड्यांवर शाई टाकली. सोबत आणलेला प्लॉस्टीक चपलांचा हारही त्यांच्या गळयात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सहाय्यक संचालक यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात बोलाविले असता शर्मा यांनी चपलांचा हार कार्यालय परिसरात टाकून तिेथून पळ काढला.
याप्रकरणी सहाय्यक संचालक मरे यांनी भंडारा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. तथापि पोलिसांनी अद्याप संबंधितांना अटक केलेली नाही. ही बाब गंभीर असून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे.
मिश्रा यांनी शासकीय कामात अडथडा निर्माण करुन शासकीय अधिकाऱ्यांची मानहानी केली. यासाठी त्यांना तात्काळ अटक करावी आणि पोलिस कोठडी द्यावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना बुधवारला निवेदन दिले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण शासनाकडे पाठवून शासकीय अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण्यात निर्माण करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई न झाल्यास माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या निधनानिमित्त घोषित केलेला शासकीय दुखवटा संपल्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल पडोळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संघटन सचिव डॉ.संपत खिल्लारी , भंडारा जिल्हा समन्वय समितीचे महासचिव शांतीदास लुंगे, तिनही उपविभागीय अधिकारी तसेच अन्य सर्व विभागांचे ७० अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ink poured on the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.