खड्ड्यात वृक्षारोपण करुन नगर परिषदेचा अभिनव निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:44+5:302021-07-29T04:34:44+5:30

भंडारा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात मोठाले खड्डे पडले आहेत. नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यानंतरही खड्डे बुजविण्याचे सौजन्य ...

Innovative protest of the city council by planting trees in the pit | खड्ड्यात वृक्षारोपण करुन नगर परिषदेचा अभिनव निषेध

खड्ड्यात वृक्षारोपण करुन नगर परिषदेचा अभिनव निषेध

googlenewsNext

भंडारा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात मोठाले खड्डे पडले आहेत. नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यानंतरही खड्डे बुजविण्याचे सौजन्य नगरपरिषद दाखवित नाही. यासाठी भंडारा शहर युवक-युवती व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करुन नगरपरिषद प्रशासनाचा अभिनव निषेध केला.

भंडारा शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्रिमूर्ती चौक ते मुस्लीम लायब्ररी या काॅलेज मार्गावरील रस्त्यावर तर मोठाले खड्डे आहेत. या खड्ड्यातून वाहन चालविणे धोक्याचे होत आहे. अनेक अपघात होत आहेत. बहिरंगेश्वर मंदिर परिसरातील वळणावरही मोठाले खड्डे दिसून येतात. या खड्ड्यात पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचत आहे. अशीच अवस्था शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु दखल घेतली नाही. त्यामुळे अभिनव आंदोलन करीत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, हेमंत महाकाळकर, आशिष दलाल, अश्विन बांगडकर, बाळा गभणे, गणेश चौधरी, गणेश बानेवार, राजू पटेल, सोनू खोब्रागडे, नेहा शेंडे, हर्षा वैद्य, राहुल निर्वाण, नितीन तुमाने, किरण वाघमारे, राहुल वाघमारे, हिमांशू मेंढे, विक्की रावलानी, मयूर पंचबुद्धे, शुभम बागडे, निशांत बुरडे, सोनू कनोजे, गौरव गुप्ता, पीयूष न्यायकरे, सारंग गभणे, अजय आजबले, अवी हेडाऊ, नीलकमल बन्सोड, जयंत बन्सोड, मयूर धुळसे, अभिषेक मेश्राम, साहिल टेंभरे, ऋषी कारेमोरे, स्वप्निल गहाणे, पार्थ नखाते, खुशाल तनमे, रोहित बनकर, तन्मय साकुरे, युगल साहो, नुमान खान, साहिल अन्सारी, रिंकेश मुल, देवा मेश्राम, अतुल काटकर, सुहास डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Innovative protest of the city council by planting trees in the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.