कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांनी केलेल्या कामांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:55+5:302021-02-05T08:42:55+5:30

तीन लाखांच्या आतील कामे स्वतः कंत्राटदार म्हणून कामे करतात आणि काम न करता बोगस पद्धतीने देयके उचलण्यात आले. सदर ...

Inquire about the work done by the Executive Engineer and Sub-Divisional Engineer | कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांनी केलेल्या कामांची चौकशी करा

कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांनी केलेल्या कामांची चौकशी करा

Next

तीन लाखांच्या आतील कामे स्वतः कंत्राटदार म्हणून कामे करतात आणि काम न करता बोगस पद्धतीने देयके उचलण्यात आले. सदर कामे केलेलीच नाही. या प्रकरणामध्ये अधीक्षक अभियंतांचे संगनमत असल्याचे समजते. सदर वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता कामे केल्याचे निदर्शनास येत आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर यांच्याकडून लेखी स्वरूपात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री ना. जयंत पाटील यांना शनिवारी भंडारा जिल्हा दौऱ्यावर असताना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

रामदास बडवाईक, शुभम गभणे, दिगंबर समरीत, सतीश बन्सोड, विक्की सिंगनजुडे, धनराज चौधरी, देवानंद भगत, सुशील डोंगरे, रविशंकर बडवाईक, शंकपाल मानापुरे, राधेश्याम गभणे, अनिल बडवाईक, गोवर्धन सिंदपुरे, रवी सिंगनजुडे, दिनेश्वरी बडवाईक, ऊर्मिला बांते, सुनीता गभणे, सीमा बडवाईक यासह खरबी येथील ग्रामवासी उपस्थित होते.

Web Title: Inquire about the work done by the Executive Engineer and Sub-Divisional Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.