गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

By Admin | Published: April 6, 2017 12:24 AM2017-04-06T00:24:33+5:302017-04-06T00:24:33+5:30

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा कार्यालयाअंतर्गत गरीबांच्या हिताचे शासकीय गोदामातील अन्न धान्यात झालेल्या ....

Inquire into delays | गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

googlenewsNext

धरणे आंदोलन : गैरव्यवहार उघडकीस आणण्याची मागणी
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा कार्यालयाअंतर्गत गरीबांच्या हिताचे शासकीय गोदामातील अन्न धान्यात झालेल्या व होत असलेल्या कथीत भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे. सदर गैरव्यवहार जनतेसमोर यावा यासाठी ३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर एक दिवसीय धरणे देवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांतर्गत सुधारित वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे द्वारपोच वाहतूक कंत्राट कालावधी ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत देण्यात आली आहे. त्यात कंत्राटदार यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे वाहतूक करणाऱ्या गाड्यांना हिरवा रंग करणे अनिवार्य आहे. कंत्राटदारांनी वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना हिरवा रंग केल्याचे पत्र पुरवठा अधिकारी यांना दिले आहे. परंतु त्या पत्रावर तारीख व वर्ष नमूद नाही. बिन तारीख असलेला पत्र स्वीकारून अधिकाऱ्यांनी कंत्राट कसा मंजूर केला? म्हणून माहितीचे अधिकार अंतर्गत नांदेड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र देवून माहिती मागितली असता त्यांनी गाड्यांना हिरवा रंग केल्याचा कुठेही नोंद नाही. डिसेंबर २०१५ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कारधा गोडाऊन, पवनी, तुमसर, वरठी गोदामातून अन्नधान्य उचल करण्यात आले. मात्र ते अन्नधान्य कोणत्या गोदामामध्ये गेले.
त्यावर रिप्रेझेंटीव्ह डी.एस.ओ. अधिकारी यांची किंवा त्यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांची सही नाही असे २९ पत्र माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीत मिळाले आहे. झालेल्या करारनाम्याचे कंत्राटदार यांनी पालन न केल्यामुळे कंत्राट रद्द करण्यात यावा या आशयाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी भंडारा यांनी मुळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी भंडारा यांची तक्रार विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली. विभागीय आयुक्त यांनी सदर प्रकरण विभागीय पुरवठा अधिकारी नागपूर यांच्याकडे तात्काळ चौकशीसाठी दिला.
यावेळी विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपुरे, ज्ञानेश्वर निकुरे, बळीराम सार्वे, बायाबाई बनकर, मंगला शेळके, त्रिवेणी वासनिक, वंदना वाडीभस्मे, अर्चना वांढरे, रत्नमाला वासनिक, टेकराम मेश्राम, केशव बिसने, गोपाल बसेशंकर, नलू सेलोकर, ज्योती राऊत, वर्षा बोंदरे, ज्योती भोंडे, तिलकचंद सहारे, वनिता चवळे, अशोक आंबेकर, दीक्षा मारबते, साधना शेळके अशा अनेक महिला व पुरुष उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Inquire into delays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.