महिला रुग्णालयाच्या मागणीसाठी आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:11+5:302021-01-14T04:29:11+5:30
मानवी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सदृढ होण्यासाठी ...
मानवी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सदृढ होण्यासाठी जिल्ह्यात अनेक प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून महिला दवाखान्याचा प्रस्ताव धूळखात आहे. महिला दवाखान्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली, पण यावर अजून ठाम निर्णय झाला नाही. महिला दवाखान्याची प्रलंबित मागणी पूर्णत्वास आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात ढेपाळलेली आरोग्य व्यवस्था रुळावर आणण्यासाठी महिला दवाखान्याची नितांत गरज असल्याची मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली.
शासकीय रुग्णालयात असलेल्या उणीव तत्काळ दूर करून पूर्वरत सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आमदार राजू कारेमोरे यांनी यावेळी राज्यपाल यांना वास्तविक परिस्थिती लक्षात आणून देत, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.