गरजूंच्या लाभासाठी निरीक्षण करा
By admin | Published: May 14, 2017 12:25 AM2017-05-14T00:25:10+5:302017-05-14T00:25:10+5:30
अन्न सुरक्षा योजनेत गावातील, वार्डातील प्रत्येक गरजुपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी सुक्ष्म निरीक्षण करुन नावे नोंद करावे.
चरण वाघमारे यांचे निर्देश : तुमसर, मोहाडी तालुका दक्षता समितीची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अन्न सुरक्षा योजनेत गावातील, वार्डातील प्रत्येक गरजुपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी सुक्ष्म निरीक्षण करुन नावे नोंद करावे. मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावे, तालुक्यातील धान खरेदी केंद्राची माहिती घेवुन आवश्यक कार्यवाही करावी. रब्बी धानासाठी तात्काळ धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे ठरावाद्वारे जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी अन्न पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तालुका स्तरावर तालुका दक्षता समितीची रचना करण्यात आलेली आहे. आमदार चरण वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली दर महिण्याला ही समिती नियमित सभा बोलावुन समितीचे कार्य करीत असते. तुमसर व मोहाडी तालुका दक्षता समिती सभा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खापा विश्राम गृहात घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
या सभेत समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते. यात मागील सभेचे अनुपालन अहवाल सभेतील निदेर्शाचे कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
ग्रामपंचायती स्तरावरील दक्षता समितीचा आढावा, गोदाम व्यवस्थेचा आढावा, आदीवासी व इतर विभागाच्या आश्रमशाळा, निवासी शाळा, मुकबधीर विद्यालय, वस्तीगृह इत्यादी आस्थापणा शिधापत्रिकांची माहीती घेण्यात आली. त्यात तुमसर तालुक्यात एकुन कार्ड संख्या १५, विद्यार्थ्यी संख्या १५३७, दरमहा वाटप धान्य गहु ७३.८५ किलो, तांदुळ १५३.७० किलो असल्याचे निर्दशनास आले. तसेच तालुक्यातील निलंबीत रास्तभाव दुकाने ही तात्पुरत्या स्वरुपात नजिकच्या दुकानाला जोडण्याचे परंतु त्याच ठिकाणी जावुन धान्य आदी माल वाटण्याचे सुचना देण्यात आली. यावेळी उपस्थित प्रश्नावर आमदार व अधिकाऱ्यांनी चर्चा करुन समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली.
यावेळी तुमसर व मोहाडीचे नगराध्यक्ष, अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तुमसर तालुका समितीचे सदस्य प्रमोद घरडे, बंटी बानेवार, युवराज हुड, पल्लवी कटरे, कुंदा वैद्य, लक्ष्मीकांत सलामे, कैलाश पडोळे, बंडु बनकर, तसेच मोहाडी तालुक्यातील समितीचे सदस्य महादेव शेंडे, दिंगाबर कुकडे, महानंद डेकाटे, उषाताई गिरीपुंजे, विद्या भिवगडे आदी उपस्थित होते.
विद्युत वितरण व्यवस्थेचा आढावा
तुमसर: मोहाडी व तुमसर तालुकास्तरीय विद्युत नियंत्रण समितीची बैठक आमदार चरण वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली खापा विश्राम गृहात आयोजित करण्यात आली. यात तुमसर आणि मोहाडी दोन्ही तालुक्यातील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थीत होते. त्यात आमदार चरण वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दोन्ही तालुक्यातील असणाऱ्या विज वितरण विभागामार्फत होणाऱ्या गैरसोयीची दखल घेता आमदार चरण वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात विद्युत वितरण विभागाकडुन कोणत्याही प्रकारची गैरसोय खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात सांगितले . मोहाडी तालुक्यातील जांब विद्युत वितरण केंद्राच्या अंतर्गत, बोंदरी, पांजरा, वासेरा, घोरपड, धुसाळा, नवेगाव, खैरलांजी येथे काही समस्या नसल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी समाधान व्यक्त केले. आणि देऊळगाव, व कांद्री येथे लाईन शिफटीेंगचे काम सुरु असल्याने व ताडगाव येथे ट्रान्सफार्मर बदली करण्याचे निर्देश देण्यात आले. याव्यतिरीक्त पिंपळगाव, आंधळगाव, बोंदरी, हरदोली, रामपूर, मांडेसर, खुटसावरी, चिचखेडा, खोडगाव, रोहा, महालगाव, कुशारी, धर्मापुरी, तसेच तुमसर तालुक्यातील तुमसर शहर येथील शिवाजी नगर, गोवर्धन नगर, हनुमान तलाव, डोंगरला, लोभी, चांदमारा, नाकाडोंगरी, राजापुर, आलेसुर, मंगरली, आंबागड, पिटेसुर, येरली, मांगली, तामसवाडी, बिनाखी, सितेपार आदी गावात विज वितरण कंपनीच्या तक्रारी आहेत. तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.