प्राचीन अवशेषांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:40 PM2018-03-03T22:40:29+5:302018-03-03T22:40:29+5:30

ऐतिहासीक प्राचीन पवनी शहराजवळ उत्खननात अडीच हजार वर्षापूर्वीचा सापडलेल्या जगन्नाथ टेकडी बौद्धस्तुपाला मुंबई विद्यापीठाच्या पालीभाषा विभाग प्रमुख डॉ.योजना भगत यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या ८५ संशोधक विद्यार्थ्यांच्या पथकाने भेट दिली.

Inspection of ancient remains | प्राचीन अवशेषांचे निरीक्षण

प्राचीन अवशेषांचे निरीक्षण

Next
ठळक मुद्देभावी संशोधकांची बौद्ध स्तुपाला भेट: शिलालेखांचे केले वाचन

आॅनलाईन लोकमत
पवनी : ऐतिहासीक प्राचीन पवनी शहराजवळ उत्खननात अडीच हजार वर्षापूर्वीचा सापडलेल्या जगन्नाथ टेकडी बौद्धस्तुपाला मुंबई विद्यापीठाच्या पालीभाषा विभाग प्रमुख डॉ.योजना भगत यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या ८५ संशोधक विद्यार्थ्यांच्या पथकाने भेट दिली. या विद्यार्थ्यांनी तेथे पडून असलेल्या स्तुपाच्या प्राचीन अवशेषांचे सुक्ष्म निरीक्षण या स्तुपाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
भारतीय पुरातत्व विभाग व नागपूर विद्यापीठाने १९६९ - ७० मध्ये जगन्नाथ टेकडी बौद्ध स्तुपांचे संयुक्तपणे उत्खनन केले आहे. हा स्तुप सांची व भरहूत येथील स्तुपापेक्षा आकाराने मोठा व प्राचीन असल्याने सप्रमाण सिद्ध झाले आहे. फार पूर्वी पवनी शहर हे व्यापाराचे मुख्य केंद्र असल्याचे मानले गेले आहे. हे दिनयान बौद्ध धर्माचे प्रसिद्ध मुख्य केंद्र होते. पवनी परिसरात सापडलेल्या बौद्ध स्तुपांमुळे पूर्व महाराष्ट्रातही बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे मानले गेले.
येथे सापडलेल्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या बौद्ध स्तुपांमुळे इतिहास संशोधक मोठ्या संख्येने भेट देण्याकरिता येत असतात. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे स्तुपाच्या आवारात आगमन होताच त्यांनी स्तुपासमोर नतमस्तक होवून तीन वेळा स्तुपाला बुद्धवंदना म्हणत प्रदक्षिणा घातल्या. याप्रसंगी हुई नेग फाउंडेशनचे सत्यजीत मौर्य यांनी पाली विभाग प्रमुख डॉ.योजना भगत यांना तीन्ही स्तुपांचा रिपोर्ट असलेले पुस्तक भेट देवून या स्तुपांविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी डॉ.योजना भगत यांनी पवनी जवळील तिन्ही प्राचीन स्तुप व मुंबई जवळील जालासोपारा येथील स्तुप या दोन ठिकाणचे बौद्धस्तुप हे अडीच हजार वर्षापूर्वीचे व महाराष्ट्रातील उत्खनन केलेले बौद्धस्तुप हे अडीच हजार वर्षापूर्वीचे व महाराष्ट्रातील उत्खनन केलेले बौद्ध स्तुप आहेत, असे सांगून स्तुपाची माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्तुपांच्या प्राचीन अवशेषांचा अभ्यास करून काही अवशेषांवर ब्राम्ही भाषेत कोरलेल्या अक्षरांचे वाचन केले. याप्रसंगी जी.डी. मेश्राम, आनंदविलास रामटेके, लक्ष्मीकांत तागडे, रमेश मोटघरे मुंबईचे राहुल राव, प्रकाश थोरात, सिद्धार्थ लभाने यांच्यासह ८५ विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Inspection of ancient remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.