मिश्र रोपवन व मध्यवर्ती रोपवाटिकेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:30 PM2017-10-10T23:30:28+5:302017-10-10T23:30:39+5:30

जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली.

Inspection of mixed ropeway and central nursery | मिश्र रोपवन व मध्यवर्ती रोपवाटिकेची पाहणी

मिश्र रोपवन व मध्यवर्ती रोपवाटिकेची पाहणी

Next
ठळक मुद्देप्रोत्साहन : जिल्हाधिकाºयांची झरपडा व मालकनपूरला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली. तसेच वृक्ष वाढीची प्रत्यक्ष पाहणी केली.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे ग्रामीण भागातील खरे वास्तव चित्र जवळून पाहण्यासाठी तसेच गावखेड्यातील सामान्य जनतेशी समरस होऊन त्यांच्याशी हितगूज साधून गावाचा विकास होण्याच्या हेतूने ग्रामीण क्षेत्रात भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे निश्चितच सामान्य मानसाला पाठबळ देत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच प्रदूषणावर आळा बसावा म्हणून गावागावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करावे. आपल्या सानिध्यातील वृक्षांची लागवड तसेच फळवृक्ष लागवड व्हावी, हा त्यांचा हेतू आहे.
अर्जुनी-मोरगाव येथे ४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत १ जुलै रोजी लागवड करण्यात आलेल्या मिश्र रोपवन झरपडा या ठिकाणी जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देऊन रोपवनबद्दलची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. रोपवनाला भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी काळे यांचे, वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी रोपटे देऊन स्वागत केले. वनपरीक्षक पी.के. ब्राम्हणकर यांनी जिल्हाधिकाºयांना रोपवनाबद्दल माहिती देताना सांगितले की, मिश्र रोपवन झरपडा येथे ४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत गोसे संरक्षीत वन कक्ष क्रं. ४६४०६५ मधील १५ हेक्टरमध्ये १६ हजार ६६५ वृक्षांची लागवड श्रमदानातून करण्यात आली. आजघडीला ३ ते ५ फुट रोपांची उंची वाढलेली असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिले.
सदर रोपवनात विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रोपवनाची झालेली वाढ पाहून जिल्हाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले. तसेच रोपवनात आपल्या सानिध्यातील वृक्ष तसेच फळ देणाºया वृक्षांची लागवड करावी, असे मनोगत व्यक्त केले.

Web Title: Inspection of mixed ropeway and central nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.