सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:44 PM2017-10-31T23:44:32+5:302017-10-31T23:44:58+5:30

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे.

Inspire the work of Sardar Patel and Indira Gandhi | सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या

सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राष्ट्रीय एकतेसाठी धावले भंडारा शहर, राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे. सगळ्यांना एकाच धाग्यात गुफण्याचं काम त्यांनी केले. सरदार या नावातच नेतृत्वगुण दिसून येतात. म्हणूनच आज राष्ट्रीय एकता दिनाचे व राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, पोलीस उपअधीक्षक सुनील कुळकर्णी, उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, तहसीलदार संजय पवार, अधीक्षक वरूण शहारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, १९७१ च्या युध्दात संपूर्ण जगास विस्मयकारक राजकीय निर्णय घेऊन पाकिस्तान व बांगला देशसोबतच्या युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कठोर निर्णयाबदद्दल त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हटले जाते. या दोन्ही नेत्यांना स्मरण करण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या महान नेत्यांचे चरित्र तरूणांनी व विद्यार्थ्यांनी वाचून त्यांचे गुणकर्तृत्व आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस तर इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला.
मंगळवारला सकाळी महात्मा गांधी चौक ते जिल्हा क्रिडा संकुलापर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडला जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. या दौडमध्ये विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात विविध क्रीडा संघटना सहभागी झाल्या होत्या. एकता दौडचा समारोप जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी तर उपस्थितांचे आभार दिलीप ईटनकर यांनी मानले.

Web Title: Inspire the work of Sardar Patel and Indira Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.