थँक्स अ टीचर उपक्रमात माजी विद्यार्थ्यांनी दिली प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:10+5:302021-09-07T04:42:10+5:30
तुमसर : शारदा विद्यालयाने थँक्स अ टीचर उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली. आमच्यात नेतृत्व प्रक्षेपित व प्रतिभा ...
तुमसर : शारदा विद्यालयाने थँक्स अ टीचर उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली. आमच्यात नेतृत्व प्रक्षेपित व प्रतिभा निर्माण करण्याची संधी दिली, त्यामुळेच योग्यता सिद्ध करता आली. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वाभाविकपणे प्रेरणा मिळत जाते. आदर्श विद्यार्थी व आदर्श पिढी घडविण्यासाठी आमच्या शिक्षकांनी आम्हांस बोधामृत पाजले. सुसंस्कृत व सृजनशील बनविण्यासाठी या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या लहान विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या अध्यापनाचे शिस्त व संस्कारांचा अंगिकार करून स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे, असा हितोपदेश माजी विद्यार्थिनी व विद्यार्थी इंजि. वैष्णवी गिरीपुंजे, भावी डॉ. गीतांशु डिंकवार, प्रसिद्ध गायक - प्रिन्स मेरुगवार यांनी केला. थँक्स अ टीचर या उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक राजेश तिडके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राहुल डोंगरे होते. शासनाने दिलेल्या आदेशानुसार माजी विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी देण्यात आली. प्रतीक चौधरी, मनस्वी भांडके, हिमांशी ढोके, विधी मलेवार, श्रावी बोरकर, आयुषी भुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधी मलेवार, महेक कुर्वे, अमिषा गलबले, चेतना हेडाऊ, तोषिका बांडेबुचे, मृणाल निनावे, दिया कामथे, तन्वी भुरे यांनी गीते सादर करून शिक्षक दिन या कार्यक्रमात रंगत भरली. आजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असून, प्रत्येकाने प्रामाणिकपणा जोपासून आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश तिडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया पाहुणे आणि श्वेता शहारे यांनी केले. हिमांशी ढोके हिने आभार मानले. कार्यक्रमाकरिता माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. यावेळी शिक्षक वासू चरडे, दीपक गडपायले, संजय बावनकर, रुपराम हरडे, अशोक खंगार, आशिष मुधोळलकर, नीतुवर्षा घटारे, प्रीती भोयर, रेखा बडवाईक, सीमा मेश्राम, प्रा. रूपा रामटेके, प्रा. माधवी खोब्रागडे, विद्या मस्के, विजय बावनकर, उर्मिला नेवारे, नारायण मोहनकरसह आजी - माजी विद्यार्थी उपस्थित होते.