एकात्मिक ऊर्जा विकास योजनेमुळे आता २४ तास वीज

By admin | Published: November 23, 2015 12:31 AM2015-11-23T00:31:58+5:302015-11-23T00:31:58+5:30

वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणे, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण ...

With the integrated energy development plan now 24 hours power | एकात्मिक ऊर्जा विकास योजनेमुळे आता २४ तास वीज

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेमुळे आता २४ तास वीज

Next

वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण : केंद्राकडून राज्यासाठी २,४०५ कोटींची योजना
देवानंद नंदेश्वर भंडारा
वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणे, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील कामे ही संबंधित मंडळ कार्यालयातील लोकप्रतिनिधींसमवेत करून घेतली जाणार आहेत.
ग्राहकांपर्यंत वीज नेण्याच्या सर्वच क्षेत्रात अत्याधुनिकता असणे आता काळाची गरज झाली आहे. सिंगल फेजिंग, गावठाण फिडर्स, पुनर्रवित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम व पायाभूत आराखडा प्रकल्प अशा विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने आपल्या विद्युत यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण केले आहे.
या सर्वांचा परिणाम म्हणून वीज वितरण यंत्रणेत काही आमूलाग्र बदलही घडले आहेत. या सुधारणांमध्ये आणखी गतिमानता आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना मंजूर केली आहे. या योजनेमध्ये महावितरणच्या ४४ मंडळ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये या योजनेची कामे होणार आहेत. यामध्ये ३३ बाय ११ केव्ही ची १२८ नवीन उपकेंद्रे बांधण्यात येणार असून ६० उपकेंद्राची क्षमता वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ३७७८.७२ किमीच्या उच्चदाब, तर ३१५१.८८ किमीच्या लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय या सर्व भागात सुमारे ६ हजार वितरण रोहित्रे उभारले जाणार आहेत. ही कामे तातडीने आणि दर्जेदार होण्यासाठी संबंधित मंडळ कार्यालयातील लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा करून केली जाणार आहेत. त्यांच्याकडून तसे प्रमाणपत्र घेऊन ही कामे पूर्णत्वास आणावयाची आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास महावितरणला आहे.

Web Title: With the integrated energy development plan now 24 hours power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.