आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना रुजू करणार

By admin | Published: June 17, 2017 12:19 AM2017-06-17T00:19:56+5:302017-06-17T00:19:56+5:30

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या.

Inter-relocation teachers will be involved | आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना रुजू करणार

आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना रुजू करणार

Next

शिक्षण समितीचा ठराव : शाळांना मिळणार क्रीडा साहित्य व निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये शिक्षकांवर अन्याय होवू नये म्हणून त्यांना भंडारा जिल्हा परिषदेने रुजू करावे असा ठराव आज शुक्रवारला शिक्षण समितीने घेतला आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा पार पडली. या सभेला जिल्हापरिषद सदस्य धनेंद्र तुरकर, आकाश कोरे, राणी ढेंगे, अशोक कापगते, वर्षा रामटेके, प्रेरणा तुरकर, प्रणाली ठाकरे, उपशिक्षणाधिकारी मोहन चोले, शिक्षक नेते मुबारक सैय्यद, रमेश सिंगनजुडे यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या सभेत बदली प्रक्रियेतील शिक्षकांवर अन्याय होवू नये हा मुद्दा या सभेत उपस्थित केला. सोबतच जिल्हा क्रीडा विभागाकडे शाळेच्या आवारभिंत, मैदान सपाटीकरण, व्यायाम शाळा खेळाचे साहित्य मिळण्याबाबत ज्या शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहे. अशांना तातडीने जिल्हा क्रीडा निधीतून साहित्य व निधी द्यावा असा मुद्दा जि.प. सदस्य धनेंद्र तुरकर, आकाश कोरे, राणी ढेंगे यांनी उपस्थित केल्यानंतर त्यावर ठराव घेण्यात आला.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली आहे. पोर्टलवर ३२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याचा ठराव ही यावेळी घेण्यात आला. सहावे वेतन आयोग निश्चित करण्याकरिता वित्त विभागाने वेळोवेळी पंचायत समितींना तारखा दिल्या. मात्र वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित न झाल्याने हा मुद्दा एरणीवर आहे. त्यामुळे सेवापुस्तीकेत नोंद झाली नसल्याने हा मुद्दा मुबारक सैय्यद यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शाळा सिध्दीअंतर्गत सर्व शाळांनी स्वयंमुल्यमापन करुन २०१८ पर्यंत शाळासिध्दी करावी व यासाठी शिक्षण विभागाने सहकार्य करावे असा ठराव घेण्यात आला. प्रशासकीय बदल्या करतांना विनंती बदल्या कराव्या, असा मुद्दा मुबारक सैय्यद यांनी उपस्थित केल्यानंतर तसा ठराव घेण्यात आला. मागील वर्षी शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या मोठ्याप्रमाणात झाल्या आहेत. नविन अध्यादेशानुसार मागील बदल्या झालेल्यांनाच पात्र ठरविण्यात येणार असल्याने त्यांच्या पुन्हा बदल्या होणार असल्याने हा मुद्दा उपस्थित केला.
मोहाडी पंचायत समितीच्यामध्ये एका शिक्षकाला एकाच महिन्याचा दोन वेळेस वेतन देवून पैशाची अफरातफर करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली होती. मात्र त्या समितीने अद्यापही अहवाल दिलेला नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई होण्यास विलंब होत असल्याने याचा अहवाल तातडीने मागून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक नेते रमेश सिंगनजुडे यांनी उपस्थित केला. शाळा बंदच्या मुद्दा समितीत गाजला यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या मागण्या तातडीने सोडवाव्या असे आदेश समिती प्रमुखाने शिक्षण विभागाला दिले आहे.

धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष
फेब्रुवारी महिन्यात शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील धोकादायक इमारती निर्लेखीत करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र शाळा सुरु होत असून पावसाळा सुरु झालेला असतांनाही या इमारती पाडण्यात आलेल्या नाही. ही जबाबदारी बांधकाम विभागावर सोपविली होती. त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बांधकाम विभागाने धोकादायक इमारती पाडण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुद्दयावर सभा चांगलीच गाजली.

Web Title: Inter-relocation teachers will be involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.