शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या संगणीकृत होणार
By admin | Published: May 15, 2017 12:30 AM2017-05-15T00:30:25+5:302017-05-15T00:30:25+5:30
आंतरजिल्हा बदल्यात घोळ झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. यापुढे बदल्यात पारदर्शीपणा यावा म्हणून राज्य शासनाने संगणकीकृत आंतर जिल्हा बदलीचे वेळापत्रकच जाहीर केले.
ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश धडकले
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरजिल्हा बदल्यात घोळ झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. यापुढे बदल्यात पारदर्शीपणा यावा म्हणून राज्य शासनाने संगणकीकृत आंतर जिल्हा बदलीचे वेळापत्रकच जाहीर केले. प्रथम राज्यातील चार विभागात आंतरजिल्हा बदल्या होत आहेत. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तसा आदेश नुकताच काढला आहे.
जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने यापुर्वी निर्णय घेतला होता.
२४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारित धोरण निश्चित केले. ११ मे रोजी शासनाचे समक्रमांकाचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना या आदेशान्वये कळविण्यात आले.
आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक प्राथमिक शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज भरण्याचे शासनाने निश्चित केले आहे. यात नागपूर विभागात १५ मे ते १७ मे दरम्यान नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्हा अमरावती विभाग अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लातूर विभाग-लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद विभाग-औरंगाबाद, जालना,परभणी, हिंगोली, बीड यांचा समावेश आहे, असे ग्रामविकास व जल संधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुळवे यांनी नमूद केले आहे.
आंतरजिल्हा बदलीत पारदर्शीपणा यावा तथा कुणावर अन्याय होऊ नये तक्रारींचा ससेमिरा न लागता बदल्या करण्याचा निर्णय ग्रामविकास मांलयाने घेतल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात सुरू आहे. अशा पद्धतीने तालुका तथा जिल्हास्तरावर बदल्या करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे समजते. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यात घोळाच्या चर्चा सर्वच जिल्ह्यात सुरू होत्या. त्यांना आॅनलाईन पद्धतीने चाय बसेल असेल बोलल्या जात आहे.