विधि सेवा प्राधिकरणात आंतरराष्ट्रीय योग दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:45+5:302021-06-26T04:24:45+5:30

कार्यक्रमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुने, कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश अनिता शर्मा, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, सहदिवाणी न्यायाधीश ...

International Yoga Day at the Legal Services Authority | विधि सेवा प्राधिकरणात आंतरराष्ट्रीय योग दिवस

विधि सेवा प्राधिकरणात आंतरराष्ट्रीय योग दिवस

Next

कार्यक्रमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुने, कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश अनिता शर्मा, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, सहदिवाणी न्यायाधीश ए. के. आवारी, दिवाणी न्यायाधीश आर. एस.भोसले, सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण एस. पी. भोसले, सहदिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे, सहदिवाणी न्यायाधीश पी. ए. पटले, सहदिवाणी न्यायाधीश चेतना नेवारे, तसेच न्यायालयातील प्रबंधक, व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगतज्ज्ञ ज्ञानोबा बोडके उपस्थित होते. योग ही प्राचीन विद्या आहे. मन व शरीर याचे एकत्रीकरण म्हणजे योग. आपल्या देशात सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी महर्षी हिरण्यगर्भ यांनी योगाची सुरुवात केली. परंतु त्याकाळी लेखनाची व्यवस्था नसल्यामुळे योगाचा प्रचार-प्रसार झाला नाही. त्यानंतर अडीच हजार वर्षांपूर्वी महर्षी पतंजली यांनी प्राचीन साहित्यातून प्रेरणा घेऊन अष्टांग योग शास्त्राचे मौलिक लिखाण पतंजली योगशास्त्र या ग्रंथाव्दारे केले. अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांची शास्त्रशुध्द पध्दतीने मांडणी केली. म्हणूनच महर्षी पतंजलींना आधुनिक योगाचे जनक संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोडके यांनी प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायम, सूर्यनमस्कार, मंडुकासन, शलभासन, शिर्षासन, भुजंगासन, सर्वांगासन असे विविध योगासने करून दाखविली.

आभार सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण भंडारा एस. पी. भोसले यांनी मानले.

Web Title: International Yoga Day at the Legal Services Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.