कौशल्य विकास शिक्षण प्रणाली आणणार

By admin | Published: February 7, 2016 01:22 AM2016-02-07T01:22:25+5:302016-02-07T01:22:25+5:30

देश स्वतंत्र होऊन अर्ध शतक पेक्षा अधिक झाले. परंतु देशात अनेक सरकार आली आणि राज्य करून गेली. परंतु अद्याप कौशल्य विकासावर कोणीही भर दिला नाही.

Introducing Skill Development Education System | कौशल्य विकास शिक्षण प्रणाली आणणार

कौशल्य विकास शिक्षण प्रणाली आणणार

Next

रुग्णवाहिनीचा लोकार्पण सोहळा : नाना पटोले यांचे प्रतिपादन
भंडारा : देश स्वतंत्र होऊन अर्ध शतक पेक्षा अधिक झाले. परंतु देशात अनेक सरकार आली आणि राज्य करून गेली. परंतु अद्याप कौशल्य विकासावर कोणीही भर दिला नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवक व नागरीकांसोबत संवाद साधून युवकांच्या मनात काय आहे हे जाणून घेतले. त्याआधारावर देशात व विशेष करून भंडारा गोंदिया जिल्ह्यात कौशल्यविकास शिक्षण प्रणाली आणणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले रुग्णवाहिनी लोकार्पण प्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी आ.रामचंद्र अवसरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, जिल्हा शल्यचिकत्सिक डॉ.देवेंद्रा पातुरकर, हंसा खोब्रागडे, बावणे कुणबी समाजाचे अध्यक्ष सदानंद इलमे, पहेला जि.प. सदस्य सुभाष आजबले, माजी सभापती तुमसर पं.स. कलाम शेख व मकसुद पटेल उपस्थित होते.
ते म्हणाले, या कौशल्यविकास शिक्षणामुळे रोजगाराची दालने उभारले जातील. जेणेकरून बेरोजगारावर मात होईल. ओडीसा, आसामच्या अभ्यास दौऱ्यावर असताना सुक्ष्म निरीक्षण केले असता असे जाणवले हे राज्य अतिदुर्गम आहे. येथे भरपूर प्रमाणात रोजगाराभिन्मुख शिक्षण प्रणाली विद्यापीठामार्फत राबविली जाते. त्याच धर्तीवर या दोन्ही जिल्ह्यात कौशल्य विकासाची सर्व अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस खासदार पटोले यांनी व्यक्त केला.
भंडारा व गोंदिया जिल्हा विकासान्भिमुख झाला पाहिजे. जेणेकरून दोन्ही जिल्ह्यात रोजगाराची दालने उघडली पाहिजे, असे खा.पटोले यांनी विचार मांडले. विदर्भात अनेक वनउपज आहेत. परंतु त्यांच्या रोजगाराभिन्मुख उपयोग कसा करायचा याची कल्पना नसल्याने तो जंगलात सडून जातो. परंतु कौशल्यविकास शिक्षण प्रणालीद्वारे मार्चपासून वनउपज कलस्टर तयार या वनउपजावर प्रक्रिया करून रोजगार निर्माण करता येईल. जेणेकरून मोहफुलावर जास्त भर दिला जाईल. या कल्पवृक्षामुळे गरीब जनतेला व युवकांना या क्लस्टर मध्ये आणून हा जिल्हा सुजलाम सुफलाम कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. सुसज्ज या रुग्णवाहिनीचे जनतेनी सेवा देण्याची संधी द्यावी. या रुग्णवाहिनीचे लोकार्पण करण्यात आला असून गरजुंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
संचालन शिवदास गायधने यांनी केले. प्रास्तराविक चंद्रशेखर रोकडे यांनी केले. आभार प्रदर्शन देवेंद्र गावंडे यांनी केले. यशस्वितेसाठी प्रभाकर राऊत, मुश्ताक भाई, आशिष चन्ने, मंगेश तुरस्कर, सूर्यकांत गभणे, मारोती बांगळकर, भास्कर खापरे, आनंद देशभ्रतार, रितेश वासनिक, गुरुदास बावनकर आदींनी अथक परिश्रम केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Introducing Skill Development Education System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.