मानव धर्माच्या सेवकाला मिळते दैवी शक्तीचा परिचय

By admin | Published: February 1, 2016 12:44 AM2016-02-01T00:44:22+5:302016-02-01T00:44:22+5:30

मानवाला चांगल्या विचाराची गरज आहे. परमार्थाकडे लक्ष असावे. समाधान बाजारात मिळत नाही. मानव चांगल्या कर्तृत्वातून जिंकत असतो.

The introduction of divine power to the human rights activist | मानव धर्माच्या सेवकाला मिळते दैवी शक्तीचा परिचय

मानव धर्माच्या सेवकाला मिळते दैवी शक्तीचा परिचय

Next

मोहाडीत सेवक संमेलन : लता बुरडे यांचे प्रतिपादन, बाबा जुमदेवजींच्या जयघोषाने दुमदुमली मोहाडी नगरी
मोहाडी : मानवाला चांगल्या विचाराची गरज आहे. परमार्थाकडे लक्ष असावे. समाधान बाजारात मिळत नाही. मानव चांगल्या कर्तृत्वातून जिंकत असतो. मानव लोभी आहे. अहंकारात तो विसरत असतो. महिला देवीपेक्षाही कमजोर नाहीत. देव हृदयात असतो. अंधश्रद्धा वाईट विचारात असते. भक्ती, शक्ती, युक्ती असे भगवत कार्य करा. दैवी शक्ती दिसत नाही. दैवी शक्तीचा परिचय मानव धर्माच्याच सेवकाला मिळतो, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख मानवधर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने परमात्मा एक सांस्कृतिक भवन मोहाडी येथे सेवक संमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले होते. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, नगरपंचायत अध्यक्ष स्वाती निमजे, उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, आशिष पात्रे, महादेव बुरडे, अ‍ॅड.गुल्हाणे, विजय चाचीरे, भजनलाल पधा, पांडूरंग वंजारी, किशोर चौधरी, बंडू आसुटकर, मनिषा साठवणे, संतोष भुरे, नगरसेविका सायत्रा पारधी, मंडळाचे उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, राजू पिल्लारे, नत्थू कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजू माटे, गुरुदास शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे, शोभा भुरे, नरेश ईश्वरकर आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन म्हणाले, व्यसनमुक्तीचे काम परमात्मा एक सेवक मंडळाकडून देशासाठी होत आहे. संमेलनातून सेवक व्यसनमुक्तीचे प्रण घेऊन जातात. मंडळाचे काम देशाला मजबूत करण्यासाठी करीत आहेत. मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले म्हणाले, ग्रंथाचा उपयोग मानवाच्या विकासासाठी होतो. कोणतेही दु:ख दूर करण्यासाठी शक्ती मानव धर्माच्या कार्यात आहे. सत्य, मर्यादा व प्रेम या तत्वाचे पालन काटेकोरपणे सेवकांनी करावे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी संतोष भुरे, वसंता उरकुडे, योगेश वाडीभस्मे आदींनी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीवर सेवकांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून मंडळाचे सचिव मोरेश्वर सार्वे यांनी मंडळाच्या कार्याची प्रगती विषद केली. यावर्षीपासून बाबा जुमदेवजी स्वच्छता अभियान कार्यक्रम गावागावातून राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मोहाडी नगरातून व्यसनमुक्ती व बाबा जुमदेव यांच्या जीवनावर झांकीसह रॅली काढण्यात आली. एकूण दहा झांकीचा समावेश होता. झांकीचा प्रथम पुरस्कार रामरतन नागफासे, दुसरा गौरव पोटभरे, तिसरा परमपूज्य सेवक मंडळ खापा, चौथा जैराम देशमुख, पाचवा देवचंद सेलोकर व सहावा पुरस्कार अमोल भालाधरे यांच्या झांकीला देण्यात आला. सकाळपासून स्वयंप्रेरणेने सेवक मंडळी मिळेल त्या वाहनाने मोहाडी येथे येत होत. बरेच सेवक मंडळी पायी चालून आले होते. मोहाडीच्या प्रत्येक रस्ता सेवकांच्या गर्दीने फुलला होता. संमेलनस्थळी भक्तांच्या आतील व बाहेर बसायला जागा शिल्लक नव्हती. अनेक सेवकांना बाहेरून बाबांचा जयघोष करावा लागत होता. मोहाडीला यात्रेसारखे स्वरुप आले होते.
यावेळी जिल्ह्यातील प्रथम सेवक रघू पिल्लारे, लक्ष्मण डहारे, विलास बुधे, प्रभूदास पडारे, किसन डेकाटे, बळीराम सव्वालाखे, शंकर बिरणवारे, हिरालाल उपरीकर, सहादेव कातोरे, वनराज बुधे, सायत्रा थोटे, लक्ष्मी डेकाटे आदींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन इंद्रपाल मते, तृप्ती दिवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष कंठीराम पडारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास भगवान पिल्लारे, श्रीकृष्ण झंझाड, लक्ष्मण माहुले, युवा संघटना, सेवकांनी मदत केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The introduction of divine power to the human rights activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.